शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
4
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
6
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
7
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
8
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
9
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
10
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
11
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
12
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
13
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
14
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
15
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
16
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
17
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
18
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
19
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
20
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!

आणखी दोघांचा मृत्यू, २४८ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 7:41 PM

Two more died, 248 corona positive आणखी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींचा आकडा ४०४ झाला आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून सोमवार, १५ मार्च रोजी आणखी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींचा आकडा ४०४ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २१२ तर रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये ३६ अशा एकूण २४८ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या २१,८४७ वर पोहोचली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ५८७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २१२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३७५ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये तेल्हारा येथील १४, मोठी उमरी येथील ११, गोरक्षण रोड व मलकापूर येथील आठ, रणपिसे नगर व जीएमसी येथील प्रत्येकी सात, डाबकी रोड येथील सहा, सहकारनगर येथील पाच, न्यू राधाकिसन प्लॉट, कौलखेड, खेडकरनगर, रतनलाल प्लॉट व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी चार, शिवनगर, बाळापूर, गणेशनगर, हिंगणा रोड, रजपूतपुरा, अकोट, लहरियानगर, सोमथाना व शिवणी येथील प्रत्येकी तीन, खडकी, आनंदनगर, पातूर, आळशी प्लॉट, तापडियानगर, जुने शहर, इंदिरानगर, आदर्श कॉलनी, गांधी रोड, गुडधी, अनिकट, शिवसेना वसाहत, खोलेश्वर, माणिक टॉकीज, अंबर न्यायधीस निवारा, राऊतवाडी, मूर्तिजापूर, कैलास टेकडी, संतोषनगर व अनंतनगर येथील प्रत्येकी दोन, भीमनगर, कोठारी वाटिका, शिवाजीनगर, संग्रामपूर, पत्रकार कॉलनी, कृषिनगर, शास्त्रीनगर, बिर्ला कॉलनी, बार्शीटाकळी, न्यू भीमनगर, देशमुख फैल, स्वालंबीनगर, जीएमसी क्वॉटर, गांधीनगर, परिवार कॉलनी, माणिक टॉकीज, टेलिफोन कॉलनी, एमआयडीसी, मोमीनपुरा, तारफैल, शास्त्रीनगर, वाशिंबा, म्हाडा कॉलनी, वाशिम बायपास, खरप रोड, तोष्णीवाल लेआऊट, आंबेडकर चौक, शंकरनगर, दुर्गानगर, मोहाळी सांगवी, चोहट्टा बाजार, शंकरनगर, गांधी रोड, कृषिनगर, पारस, उमरी, जठारपेठ, गायत्रीनगर, तिलक रोड, गंगाधर प्लॉट, केशवनगर, जुने आरटीओ, महात्मा फुलेनगर, मुलानी चौक, तुकाराम चौक, माधवनगर, गाडगेनगर, सांगवी बाजार, ज्ञानेश्वरनगर, भारती प्लॉट, हरिहर पेठ, गणेश नगर, रामदासपेठ, दुर्गा चौक, भारती प्लॉट, मालीपुरा, गायगाव, संत कवर नगर व बाभूळगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

 

महिला व पुरुषाचा मृत्यू

म्हातोडी, ता. अकोला येथील ७० वर्षीय महिला व गुलजारपुरा, अकोला येथील ८२ वर्षीय पुरुष अशा दोन कोरोनाबाधित रुग्णांचा सोमवारी मृत्यू झाला. दोघांनाही अनुक्रमे ९ मार्च व १४ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.

                        

३३४ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४०, ओझोन हॉस्पिटल येथील पाच, युनिक हॉस्पिटल येथून दोन, नवजीवन हॉस्पीटल येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथून सहा, हेंडज कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथील १४, उपजिल्हा आरोग्य मुर्तिजापूर येथील तीन, आर्युवेदिक महाविद्यालयातून १२, तर होम आयसोलेशन येथील २५० अशा एकूण ३३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

५,०९६ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २१,८४७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १६,३४७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४०४ जणांचा मृत्यू झाला असून सद्य:स्थितीत ५,०९६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला