अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला असला, तरी मृत्यूचे सत्र सुरच आहे. बुधवार, २८ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यात आणखी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २७६ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,३२० झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे १६१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १३५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये रामदास पेठ येथील पाच, मूर्तिजापूर, तोष्णीवाल लेआऊट व शास्त्री नगर येथील प्रत्येकी दोन, गोडबोले प्लॉट, गणेश नगर, मलकापूर, सिव्हिल लाईन, भिरडवाडी, बाळापूर, शिवणी, व्ही.एच.बी. कॉलनी, बार्शीटाकळी, मोठी उमरी, जीएमसी, सिंधी कॅम्प, राजंदा ता.बार्शीटाकळी, गुलजारपूरा व येवला ता. बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.दोन पुरुषांचा मृत्यूबुधवारी आणखी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये बार्शीटाकळी तालुक्यातील येवला येथील ७० वर्षीय पुरुष व बाळापूर शहरातील नवानगर भागातील ७८ वर्षीय पुरुष या दोघांचा समावेश आहे. दोघांनाही अनुक्रमे २७ व २६ नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.१६४ जणांना डिस्चार्जबुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सात, बिºहाडे हॉस्पीटल येथून दोन, ओझोन हॉस्पीटल येथून एक, आयकॉन हॉस्पीटल येथून तीन, अकोला अॅक्सिीडेंट क्लिनिक येथून दोन, सूर्यचंद्रा हॉस्पीटल येथून एक तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले १४८ अशा एकूण १६४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.३६६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,३२० जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ७,६७८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २७६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३६६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
आणखी दोघांचा मृत्यू; २६ नवे पॉझिटिव्ह, १६४ जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 6:24 PM