अकोला : कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणार्यांचे सत्र सुरुच असून, सोमवार, २२ मार्च रोजी जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ४२६ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २७१, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ४२ असे एकूण ३१३ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने एकूण बाधितांचा आकडा २४,७२२ वर पोहोचला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,१७८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २७१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ९०७ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये महागाव येथील २९, बार्शीटाकळी येथील २५, डाबकी रोड येथील १५, तेल्हारा येथील ११, वाशिम बायपास व चहाचा कारखाना येथील प्रत्येकी सात, आदर्श कॉलनी, मोठी उमरी, खडकी, शिवसेना वसाहत व जीएमसी येथील प्रत्येकी सहा, कान्हेरी सरप, यशवंत नगर, अनिकट, गोरक्षण रोड, सिंधी कॅम्प, मलकापूर, पावसाळे लेआऊट, कमला नगर प्रत्येकी चार, गीता नगर, हमजा प्लॉट, चाँदखॉ प्लॉट, शिवणी, केशव नगर, कौलखेड, बाबुळगाव, खदान व महाकाली नगर येथील प्रत्येकी तीन, माना, महान, उगवा, नायगाव, गुरुदत्त नगर, अकोट फैल, शिवनगर, एमआयडीसी, अकोट, सस्ती, रणपिसे नगर, गणेश नगर, बोरगाव मंजू, रामदासपेठ, देशमुख फैल, शिवाजी नगर व गुडधी येथील प्रत्येकी दोन, अडगाव, बिहाड माथा, दगडपारवा, शिवापूर, आळंदा, राजंदा, गिरी नगर, तुकाराम चौक, राऊतवाडी, जठारपेठ, हरीहर पेठ, गुलशन कॉलनी, गंगा नगर, बाळापूर नाका, खैर मोहम्मद प्लॉट, व्याळा, गुलजारपुरा, अंबिका नगर, गणेश नगर, लोकमान्य नगर, म्हैसपूर, ओम मंगल कार्यालय, आगरवेस, रजपूतपुरा, सोनटक्के प्लॉट, अनकवाडी, देशपांडे प्लॉट, भागवत प्लॉट, फडके नगर, ज्योती नगर, गोंविद नगर, पातूर, जामठी, न्यु हिंगणा, चिखलगाव, न्यु राधाकिशन प्लॉट, जज क्वॉटर, आळशी प्लॉट, वानखडे नगर, दिपक चौक, गड्डम प्लॉट, सिव्हील लाईन, जूने शहर, कपिलवास्तू नगर, खेतान नगर, इनकम टॅक्स चौक, निमवाडी, पक्की खोली, लहान उमरी, गजानन पेठ, मोरेश्वर कॉलनी, जवाहर नगर, हसणापूर व वाडेगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
महिला व पुरुषाचा मृत्यू
कोरोनावर उपचार घेत असलेल्या दोघांचा सोमवारी मृत्यू झाला. यामध्ये बाळापूर येथील ६५ वर्षीय महिला व जागृती विद्यालय, अकोला येथील ६७ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. दोघांनाही अनुक्रमे १९ मार्च व ९ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.
६,५३५ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २४,७२२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १७,७६१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४२६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६,५३५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.