शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
2
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
3
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
4
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
5
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
6
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
7
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
8
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
9
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
10
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
11
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
12
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
13
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
14
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
15
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
16
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
17
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
18
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
19
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
20
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?

आणखी दोघांचा मृत्यू, ३३७ नवे कोरोना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 4:19 AM

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,३२४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २८२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,३२४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २८२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १,०३२ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मूर्तिजापूर येथील ४०,पारस येथील १४, डाबकी रोड येथील १६, कौलखेड, बार्शी टाकळी व खडकी येथील प्रत्येकी ११, मोठी उमरी येथील १०, पातूर येथील नऊ, जीएमसी व उरळ खु. येथील प्रत्येकी आठ, जठार पेठ व खोलेश्वर येथील प्रत्येकी सहा, राम नगर, रामदास पेठ, व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी चार, खेडकर नगर, रजपूतपुर, आदर्श कॉलनी, रतनलाल प्लॉट, म्हैसांग, तापडीया नगर, मलकापूर, अकोट, सिंधी कॅम्प, बाळापूर व जुने आरटीओ येथील प्रत्येकी तीन, गर्ल्स हॉस्टेल, कळबेंश्वर, मनकर्णा, गजाननपेठ, अखातवाडा, खिनखिनी, कोठारी नगर, न्यू खेतान नगर, तेल्हारा, पोपटखेड, पातूर, म्हातोडी, वडगाव मेंडे, नायगाव, समता नगर, येदलापूर व जामठी बु. येथील प्रत्येकी दोन, एळवण, अकोट फैल,गजानन पेठ, शिवर, विठ्ठल नगर, दगडपूल, जीएमसी हॉस्टेल, सागर कॉलनी, समता नगर, कॉंग्रेस नगर, तारफैल, माधव नगर, आदर्श कॉलनी, न्यू तापडीया नगर, खदान, जुने शहर, श्रध्दा नगर, दुर्गा चौक, देहगाव, आपातापा, कापसी, दहिखेड ता.अकोट, गायत्री नगर, नखेगाव ता.अकोट, भागवतवाडी, गोकुल कॉलनी, सहकार नगर, इसीएचएस हॉस्पिटल, रणपिसे नगर, गड्डम प्लॉट, रणपिसे नगर, दहिहांडा, अंदुरा, मांजरी, वाशिम बायपास, महाजनी प्लॉट, शिवनी, गोडबोले प्लॉट, हनुमान वस्ती, तुकाराम चौक, केशवनगर, रागिनी वर्कशॉप, टॉवर चौक, शिवाजी नगर, अयोध्या नगर,वानखडे नगर, सिसा बोंदरखेड, लहान उमरी, हमता प्लॉट, राजुरा घाटे, विद्या नगर, निता गेस्ट हाऊस व कैलास टेकडी येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.

अकोला शहरातील दोघांचा मृत्यू

कोरोनावर उपचार घेत असलेल्या अंबिका नगर, खदान येथील ७६ वर्षीय पुरुष व तापडीया नगर, येथील ७२ वर्षीय महिला अशा दोघा रुग्णांचा गुरुवारी मृत्यू झाला. या दोघांनाही १ मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

४,२४५ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १७,७८३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १३,१६२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३७६ जणांचा मृत्यू झाला असून सद्यस्थितीत ४,२४५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.