शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
3
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
4
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
5
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
6
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
7
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
8
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
9
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
10
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
11
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
12
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
13
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
14
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
15
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
16
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
17
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
18
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
19
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
20
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या

आणखी दोघांचा मृत्यू, ३९१ नवे कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 4:17 AM

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १७४० अहवाल प्राप्त झाले. यांपैकी ३३८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १७४० अहवाल प्राप्त झाले. यांपैकी ३३८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १४०२ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये सिंधी कॅम्प येथील १८, जीएमसी येथील ११, गोरक्षण रोड येथील नऊ, मूर्तिजापूर व उरळ खु. येथील प्रत्येकी आठ, डाबकी रोड, तापडिया नगर, जुने शहर, मोठी उमरी, मोहला, आपातापा, व्याळा येथील प्रत्येकी सहा, गीता नगर, लहान उमरी, शिवनी व हिवरा कोरडे येथील प्रत्येकी पाच, हनुमान वस्ती, राम नगर व निंबी येथील प्रत्येकी चार, वाशिम बायपास, शिवसेना वसाहत, जठारपेठ, खेतान नगर, मलकापूर, पातूर, झुरळ बु., मांडवा बू., वडाली देशमुख व कंजारा येथील प्रत्येकी तीन, कीर्तीनगर, संत कंवर नगर, वृंदावन नगर, जवाहर नगर, मालीपुरा, गावित फैल, गड्डम प्लॉट, नेहरु नगर, तेल्हारा, कैलास टेकडी, बाळापूर, ब्रामी वाई, स्टेशन एरिया व माझोद येथील प्रत्येकी दोन, पोलिस हेडक्वॉर्टर, हरिहर पेठ, खडकी, वानखडे नगर, ताजणा पेठ, पोला चौक, खदान, भीम नगर, सराफा बाजार, भुसारी हॉस्पीटल, आदर्श कॉलनी, बिर्ला गेट, तुकाराम चौक, पंचशिल नगर, हरिहर पेठ, बोरगाव मंजू, कलेक्टर कॉलनी, कपडा मार्केट, खोलेश्वर, बाळापूर नाका, लाल बंगला, दुबे वाडी, लेडी हार्डींग जवळ, मोहिते प्लॉट, मिलन नगर, नवाबपुरा, गौतम नगर, निमवाडी, गायत्री नगर, आनंद नगर, मराठा नगर, कृषी नगर, देशपांडे प्लॉट, गंगा नगर, दुर्गा चौक, राजेश्वर मंदिर, बालाजी नगर, भीमनगर, बाळापूर रोड, दीपक चौक, एपीएमसी मॉर्केट, दिनोडा, बस स्टॅण्ड, रामदासपेठ, हिंगणा रोड, कौलखेड, राऊतवाडी, रविनगर, येलवन, श्रीनगर, डोंगरगाव, साने गुरुजी नगर, शास्त्रीनगर, काळा मारोती, चिवचिव बाजार, जाजू मॉर्केट, कृष्ण टॉवर, देऊळगाव, बालाजी नगर, गोयका नगर, अकोट, कळबेश्वर, कुरणखेड व पैलपाडा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

सायंकाळी पातूर येथील १९, लहान उमरी व मोठी उमरी येथील प्रत्येकी सात, रणपिसे नगर येथील सहा, कुरणखेड, जठारपेठ व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी तीन, पैलपाडा, जवाहर नगर, शास्त्री नगर, न्यु राधाकिसन प्लॉट व खडकी येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित नेकलेस रोड, उत्तरा कॉलनी, गोरक्षण रोड, शिवसेना वसाहत, मलकापूर, सांगळूद, मुर्तिजापूर, वर्धमान नगर, सातव चौक, मुकुंद नगर, माधव नगर, सुधीर कॉलनी, भारती प्लॉट, जुने शहर, म्हैसांग, गजानन नगर, शिवणी, आदर्श कॉलनी, खोलेश्वर, न्यू तापडिया नगर, लक्ष्मीनगर, काटेपूर्णा, अन्वी मिर्झापूर, निपाणा, भारतीय हॉस्पिटल, डाबकी रोड, दीपक चौक, जीएमसी व जीएमसी हॉस्टेल येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

दोघांचा मृत्यू

शनिवारी सिव्हिल लाइन अकोला येथील ७३ वर्षीय पुरुष व नायगाव, अकोला येथील ६५ वर्षीय पुरुष अशा दोन कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघांनाही अनुक्रमे २७ फेब्रुवारी २ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.

१९६ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४०, हेंडज कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथील १२, बिहाडे हॉस्पिटल येथील आठ, ओझोन हॉस्पिटल येथील दोन, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथील दोन, आयकॉन हॉस्पिटल येथील आठ, हॉटेल रिजेन्सी येथील तीन, हॉटेल स्कायलार्क येथून पाच, आर्युवेदिक रुग्णालय येथून १२, अवघाते हॉस्पिटल येथून आठ, आधार हॉस्पिटल मूर्तिजापूर येथून तीन, नवजीवन हॉस्पिटल येथून एक, तर होम आयसोलेशन येथील ९२ अशा एकूण १९६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

४,५३३ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १८,७८०जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १३,८६४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३८३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४,५३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.