अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, बुधवार २३ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २१५ वर गेला. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ६९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ६८२७ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २५९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ६९ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १९० अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये तारफैल, सिंधी कॅम्प व हरिहर पेठ येथील प्रत्येकी पाच, कौलखेड, खडकी, मोठी उमरी येथील तीन जण,सारकिन्ही, रामदासपेठ, जीएमसी येथील प्रत्येकी दोन, सार्वजनिक बांधकाम विभाग वसाहत, केशव नगर, कलाल चाळ, माधव नगर, जूना कापड बाजार, न्यु भीम नगर, रेणूका नगर, रणपिसे नगर, बहिरगेट, बाशीर्टाकळी, ख्रिश्चन कॉलनी, गौरक्षण रोड, डाबकी रोड, अकोट, लहान उमरी, मलकापूर, वडाळी देशमुख, देशमुख फैल, जय हिंद चौक, वानखडे नगर, खोलेश्वर, शिवाजी नगर, गीता नगर, दाळंबी, मुर्तिजापूर व पागोरा ता. पातूर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी जीएमसी येथील दोन जणांसह राजाराम नगर, रणपिसे नगर, आकृती नगर, बार्शीटाकळी, डाबकी रोड, लक्ष्मी नगर, काटेपूर्णा, राम नगर, गड्डम प्लॉट, सिंधी कॅम्प व खदान येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.दोघांचा मृत्यूबुधवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला. हिरपूर ता. मुर्तिजापूर येथील ४५ वर्षीय पुरुषाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच खाजगी रुग्णालयात आळशी प्लॉट येथील ५८ वर्षीय पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.१५५ जणांना डिस्चार्जदुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ३० जणांना, कोविड केअर सेंटर, अकोला येथून १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाला अशा ११० जण अशा एकूण १५५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.१,६६७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६,८२७ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ४,९४५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २१५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,६६७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
आणखी दोघांचा मृत्यू; ६९ नवे पॉझिटिव्ह; १५५ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 6:47 PM