अकोला : आगामी सणासुदीचे दिवस लक्षात घेता मध्य रेल्वेने विशेष गाड्या सुरु करण्याचा धडाकाचा लावला असून, येत्या २१ आॅक्टोबरपासून पोरबंदर-हावडा आणि भूवनेश्वर-लोकमान्य तिलक टर्मिनन्स या दोन फेस्टिव्हल स्पेशल जोडी रेल्वेगाड्या धावणार आहेत. या गाड्या पुर्णपणे आरक्षीत असून, यासाठी २० आॅक्टोबरपासून आरक्षण सुविधा सुरु होणार आहे. गाड़ी क्रमांक ०९२०५ डाउन पोरबंदर - हावड़ा विशेष गाड़ी २१ आॅक्टोबरपासून २६ नोव्हेंबरपर्यंत दर बुधवार , गुरुवारला प्रस्थान स्टेशनहून सकाळी ८ वाजता रवाना होइल आणि तिसºया दिवशी हावड़ा स्टेशनला पहाटे ३.३६ वाजता पोहोचेल. ही गाडी दर गुरुवार व शुक्रवारी अकोला स्थानकावर येईल. गाड़ी क्रमांक ०९२०६ अप हावड़ा - पोरबंदर साप्ताहिक विशेष गाड़ी दिनांक २३ आॅक्टोबरपासून ते २८ आॅक्टोबरपर्यंत हावड़ा स्टेशनहुन रात्री १०.५० वाजता प्रस्थान करेल आणि तिसºया दिवशी - पोरबंदरला सायंकाळी ६.१० वाजता पोहोचेल. गाड़ी क्रमांक ०२८८० अप भुवनेश्वर-लोकमान्य तिलक टर्मिनस ही विशेष गाड़ी ही २२ आॅक्टोबरपासन ३० नोव्हेंबरपर्यंत दर सोमवार व गुरुवार ला प्रस्थान स्टेशनहुन सकाळी ७.१० वाजता प्रस्थान करेल आणि दुसºया दिवशी लोकमान्य तिलक टर्मिनसला रात्री १.३५ वाजता पोहचेल. गाड़ी क्रमांक ०२८७९ डाउन लोकमान्य तिलक टर्मिनस - भुवनेश्वर ही विशेष गाड़ी ही २४ आॅक्टोबरपासून २ आॅक्टोबरपर्यंत दर बुधवार व शनिवार ला प्रस्थान स्टेशनहुन रात्री १२.१५ वाजता प्रस्थान करेल आणि दुसºया दिवशी भुवनेश्वरला सकाळी ७.१० वाजता पोहचेल.
आणखी दोन फेस्टिव्हल स्पेशल रेल्वे गाड्या धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 8:27 PM