अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला असून, बुधवार, १७ फेब्रुवारी रोजी आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३४६ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १६१, तर रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांमध्ये ४० अशा एकूण २०१ रुग्णांची नोंद बुधवारी झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १२,८६५ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ५२६ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी १६१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३६५ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये जीएमसी येथील २६, मुर्तिजापूर येथील १९, अकोट व जठारपेठ येथील प्रत्येकी सहा, गोरक्षण रोड, डाबकी रोड, चतुर्भुज कॉलनी व हिंगणा रोड येथील प्रत्येकी पाच, सिधी कॅम्प, रेणूका नगर, लहान उमरी, तोष्णीवाल लेआऊट व तुकाराम चौक येथील प्रत्येकी चार, रामदासपेठ, आदर्श कॉलनी व शास्त्री नगर येथील प्रत्येकी तीन, रणपिसे नगर, मोठी उमरी, आश्रय नगर, लक्ष्मी नगर, बार्शिटाकळी व तेल्हारा येथील प्रत्येकी दोन, तारफैल, पिंपरी खुर्द ता.अकोट, राधाकिसन प्लॉट, कौलखेड, संतोष नगर, मलकापूर, जीएसी क्वॉटर, बाळापूर, सातव चौक, मालीपुरा, उमरी, जयहिंद चौक, दिपक चौक, सराफा बाजार, जवाहर नगर, गीता नगर, टिटवा, रिधोरा, मोमिनपूरा, विठ्ठल नगर, दुर्गा चौक, पिंपलसिंगे, वाशिम बायपास, गोविद नगर, राऊतवाडी, विद्या नगर, स्नेहा नगर, तापडीया नगर, कापशी, चोहट्टा बाजार, गड्डम प्लॉट, खडकी, अकोट फैल, बाळापूर रोड, हिवरखेड ता.तेल्हारा, विद्युत कॉलनी, मराठा कॉलनी, आळसी प्लॉट, राम नगर, बिर्ला कॉलनी, गिरी नगर, न्यु तापडीया नगर व खडकी येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
दोन पुरुष दगावले
बुधवारी अडगाव खुर्द ता. अकोट येथील७१ वर्षीय पुरुष व मुर्तिजापूर येथील ७० वर्षीय पुरुष अशा दोन रुग्णांचा मृत्यू झाला. दोघांना अनुक्रमे ९ व ११ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
१,२३० ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १२,८६५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ११,२८९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३४६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत १,२३० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.