शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
6
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
7
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
8
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
9
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
10
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
11
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
12
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
13
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
14
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
15
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
16
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
17
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
18
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
19
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
20
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल

अकोला जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू, २३३ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2021 4:19 AM

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ९६५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १२९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ९६५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १२९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ८४६ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये अकोट येथील नऊ, महागाव बु., जठारपेठ, मलकापूर, कौलखेड व मूर्तिजापूर येथील प्रत्येकी पाच, मोठी उमरी, लहान उमरी, गुडदी रोड येथील प्रत्येकी चार, जुने शहर, सिंधी कॅम्प, खोलेश्वर, राऊतवाडी, सुकोडा, रतनलाल प्लॉट येथील प्रत्येकी तीन, चिखलगाव, दक्षतानगर, हिंगणा रोड, वाशीम बायपास, डाबकी रोड, पीकेव्ही क्वार्टर, खडकी, गजानन नगर, बाळापूर, जीएमसी आणि दाताळा येथील प्रत्येकी दोन, तर अंतरी, मांजरी, राधेनगर, बेलखेड, गोरक्षण रोड, शंकरनगर, नकाशी, कीर्तीनगर, खीरपुरी खु., मोहम्मद अली रोड, माधवनगर, सेलूबाजार, जवाहर नगर, गंगानगर, सुधीर कॉलनी, मनकर्णा प्लॉट, रेल, तुकाराम चौक, मुकुंद नगर, सस्ती, आलेगाव, टिळकरोड, तोष्णिवाल लेआऊट, गायत्री नगर, रुईखेड, दानापूर, चोहोट्टा, डेवडा, उरळ, केशवनगर, न्यू खेतान नगर, पहूरजिरा, रणपिसेनगर, हातगाव, लंघापूर, कंजरा, माना, शिवनी, मनबदा, गीतानगर, पारस, चतारी, बोरगाव मंजू येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

दोघांचा मृत्यू

देवरावबाबा चाळ, अकोला येथील ६३ वर्षीय महिला व डाबकी रोड येथील ६२ वर्षीय पुरुष या दोघांचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघांनाही अनुक्रमे ५ एप्रिल व २७ मार्च रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

४,१८८ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २९,२६७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल २४,६०३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४७६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४,१८८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.