शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

अकोला जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू, २४७ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 3:28 PM

CoronaVirus News मंगळवार, ९ मार्च रोजी आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने कोरानाबळींचा आकडा ३८८ वर गेला आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, मंगळवार, ९ मार्च रोजी आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने कोरानाबळींचा आकडा ३८८ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १५३, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ९४ अशा एकूण २४७ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १९,४८० वर पोहोचली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १६०८ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी ७६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १४५५ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये अकोट येथील ३०, मुर्तिजापूर येथील २१, मोठी उमरी व जठारपेठ येथील प्रत्येकी पाच, खडकी व शिवनगर येथील प्रत्येकी चार, आदर्श कॉलनी, जूने शहर, न्यु तापडीया नगर व पंचशील नगर प्रत्येकी तीन, मुंडगाव, डाबकी रोड, रजपूतपुरा, रामदासपेठ, मारोती नगर, कॉग्रेस नगर, लहान उमरी, मलकापूर, कौलखेड, गोरक्षण रोड, पोलिस क्वॉर्टर, पिंपळगाव, वाशिम बायपास, सिंधी कॅम्प, सिरसो, गजानन नगर व हिंगणा रोड प्रत्येकी प्रत्येकी दोन, तर रुईखेड, सिरसोली, वडाळी सटवाई, जऊळका, अकोली जहागीर, शिवणी, संभाजी नगर, खदान, नानक नगर, गीता नगर, निमवाडी, लक्ष्मी नगर, कसूरा, भारती प्लॉट, माळा नगर, शास्त्री नगर, न्यु खेतान नगर, वाडेगाव, देशमुख फैल, तुकाराम चौक, बाळापूर रोड, रणपिसे नगर, माळीपुरा, आपातापा रोड, न्यु राधाकिसन प्लॉट, राहुल नगर, अकोट फैल, जीएमसी, शिवाजी नगर, दताळा, बोरगाव खुर्द, गोडबोले प्लॉट, चहाचा कारखाना, शिवसेना वसाहत, हरिहर पेठ, खैर मोहमद प्लॉट, व्हीएचबी कॉलनी व कैलास टेकडी येथील प्रत्येकी एक रुग्णांचा आहे.

महिला व पुरुषाचा मृत्यू

कोरोनावर उपचार घेत असलेल्या सांगवी बाजार ता. अकोला येथील ६५ वर्षीय महिला व शास्त्री नगर, अकोला येथील ४५ वर्षीय पुरुष अशा दोघांचा मंगळवारी मृत्यू झाला. या दोघांना अनुक्रमे ३ व १ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.

 

४,९८३ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १९,४८० जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १४,१०९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३८८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ४,९८३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या