अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी खंडीत होण्याची कोणतीही चिन्हे नसून, रविवार, ४ एप्रिल रोजी आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ४७० झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १६१, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये १०५ अशा एकूण २६६ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याने आतापर्यंत कोरोनाबाधित होणार्यांची संख्या २८,८३१ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १३१४ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी १६१जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ११५४ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये आळशी प्लॉट,राऊतवाडी व गजानन नगर येथील प्रत्येकी सहा, गोरक्षण रोड येथील पाच, कौलखेड, मलकापूर, डाबकी रोड, मोठी उमरी, लहरिया नगर, निवारा कॉलनी येथील प्रत्येकी तीन, लहान उमरी, शास्त्री नगर, जीएमसी, अडगाव ता.तेल्हारा, अंदुरा, देगाव, रणपिसे नगर, सिंधी कॅम्प, शिवार, आबेंडकर नगर, गुडधी, येळवन, चिखलगाव, मुर्तिजापूर व केळकर हॉस्पीटल येथील प्रत्येकी दोन, लेडी हार्डींग, पंचशिल नगर, खरप, मोहिते प्लॉट, रेणूका नगर, आसरा कॉलनी, शिवणी, गांधी नगर, राधाकिसन प्लॉट, पार्तुडा, गिरी नगर, व्हिएचबी कॉलनी, अंबुजा, कोळासा, पारस कॉलनी, शेंडे धोत्रे, किर्ती नगर, खोलेश्वर, शिर्ला नेमाने, चतुभूज कॉलनी, दिपक चौक, तापडीया नगर, अन्नपूर्णा नगर, बैदपुरा, सोनाळा, रामदासपेठ, द्वारका नगरी, जवाहर नगर, एमआयडीसी, माता नगर, खदान, उगवा, राधेनगर, बाशीटाकळी, दत्तवाडी, ज्योती नगर, कृषी नगर, दापूरा, मालेगाव, बोरगाव मंजू, वडगाव राठे, गोरेगाव, न्यु तापडीया नगर, निमकर्दा ता.बाळापूर, कळंबा बु., वरखेड ता.तेल्हारा, कासरखेड ता.बार्शीटाकळी, केशव नगर, नाईक नगर, उरळ व खिरपुरी ता.बाळापूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
सायंकाळी अकोट येथील १५, पारस व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी तीन, खानापूर वेस ता.अकोट येथील दोन, जूना अंदुरा, रौंदळा, न्यु तापडीया नगर, राधाकिसन प्लॉट, गड्डम प्लॉट, रतनलाल प्लॉट, गोरक्षण रोड, सिंधी कॅम्प, मोठी उमरी, माना, गायत्री नगर, आपातापा रोड,जूना आळसी प्लॉट, शाहनूर ता.अकोट, चिंचपानी ता.अकोट व आसेगाव ता.अकोट येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
दोन पुरुषांचा मृत्यू
कोरोनावर उपचार घेत असलेल्या पारस येथील ५९ वर्षीय पुरुषाचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. त्यांना २९ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. सायंकाळी मुर्तिजापूर येथील ६३ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला.त्यांना १ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते.
६४३ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सात, सहारा हॉस्पीटल येथील एक, युनिक हॉस्पीटल येथील एक, अकोला ॲक्सीडेंट येथील चार, देवसार हॉस्पीटल येथील एक, नवजीवन हॉस्पीटल येथील दोन, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथील तीन, कोविड केअर सेंटर अकोट येथील दोन, समाज कल्याण हॉस्टेल येथील २५, आयकॉन हॉस्पीटल येथील दोन, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील दोन, हारमोनी हॉस्पीटल येथील एक, बिहाडे हॉस्पीटल येथील आठ, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, हॉटेल रिजेन्सी येथील सहा, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील एक, अवघाते हॉस्पीटल येथील एक, हॉटेल स्कायलार्क येथील तीन तर होम आयसोलेशन येथील ५७० अशा एकूण ६४३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
४,३३६ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २८,८३१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांपैकी तब्बल २४,०२५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४७० जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ४,३३६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.