अकोला : संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने अकोल्यातही विक्राळ रुप धारण केली असून, पॉझिटिव्ह रुग्णांसह मृतकांची संख्याही वाढतच आहे. शुक्रवार, १५ मे रोजी दिवसभरात कोविडबाधित दोन महिलांचा मृत्यू, तर ११ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. गुरुवार व शुक्रवारी अनुक्रमे फिरदौस कॉलनी व मोमीनपूरा भागातील दोन महिलांचा मृत्यू झाल्याने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १६ वर पोहचला आहे. तर एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २१८ वर पोहचली असून, सद्यस्थितीत १०१ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनकडून सांगण्यात आले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेकडून शुक्रवारी दिवसभरात १६१ अहवाल प्राप्त झाले असून, त्यापैकी ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर १५० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शुक्रवारी सकाळी खडकी भागातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तर सायंकाळी पॉझिटिव्ह आढळलेले दहा रुग्णांपैकी चार जण आंबेडकर नगर न्यू बसस्टॅण्ड मागे, दोन फिरदौस कॉलनी, दोन भिम चौक- अकोट फैल तर गवळीपुरा व पंचशिल नगर वाशीम बायपास येथिल प्रत्येकी एक जणाचा त्यात समावेश आहे. यामधील पाच महिला व पाच पुरुष आहेत. दरम्यान, गुरुवार १४ मे रोजी फिरदौस कॉलनी भागातील ३७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून, तीचा अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला. तर शुक्रवारी दुपारी मोमीनपुरा भागातील एका ६५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर महिलेला ११ मे रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. या दोन महिलांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात कोविड आजाराने मृत्यूमुखी पडलेल्यांची एकूण संख्या १६ वर गेली आहे. एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केल्यामुळे जिल्ह्यातील एकूण १७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद प्रशासन दप्तरी आहे. दरम्यान, आतापर्यंत १०० जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन कक्षात १०१ रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.आज प्राप्त अहवाल-१६१पॉझिटीव्ह-११निगेटीव्ह-१५०आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-२१८मयत-१७(१६+१),डिस्चार्ज-१००दाखल रुग्ण(अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१०१