शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
3
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
4
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
5
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
6
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
7
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
8
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
9
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
10
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
11
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
12
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
13
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
14
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
15
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
16
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
17
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
18
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
19
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
20
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...

स्वाईन फ्लू चे आणखी दोन बळी

By admin | Published: April 13, 2017 7:19 PM

अकोला :स्वाईन फ्लू या घातक आजाराची लागण झालेल्या दोन रुग्णांचा उपचारा दरम्यान गुरुवारी एका खासगी इस्पितळात मृत्यू झाला.

मृतकांची संख्या ३ वर : पॉझिटीव्ह व संशयीत रुग्णांवर उपचार सुरुअकोला : राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या स्वाईन फ्लू या घातक आजाराने अकोल्यातही पाय पसरले असून, या आजाराची लागण झालेल्या दोन रुग्णांचा उपचारा दरम्यान गुरुवारी एका खासगी इस्पितळात मृत्यू झाला. यापूर्वी ५ मार्च रोजी स्वाईन फ्लू मुळे एकाचा मृत्यू झाला होता. यात आणखी दोघांची भर पडल्याने स्वाईन फ्लू च्या बळींची एकूण संख्या ३ वर पोहचली आहे. शहरात या आजाराचे सहा पॉझिटीव्ह व ४ संशयीत रुग्ण असून, त्यांच्यावर शहरातील खासगी व सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु आहेत.एच १ एन १ या विषाणूंपासून होणारा स्वाईन फ्लू हा अत्यंत संसर्गजन्य आजार असून, त्याचा प्रसार हवेच्या माध्यमातून एका रुग्णापासून दुसऱ्यापर्यंत होतो. वराहांमध्ये हा विषाणू आढळून येत असल्यामुळे वराहांच्या संपर्कात राहिल्याने हा आजार होण्याची शक्यता बळावते. स्वाईनची लागन झालेला अमरावती येथील वडाळी नाका भागातील रुग्ण मार्च महिन्यात येथील एका मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात दाखल झाला होता. तेव्हापासून स्वाईनच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत शहरात स्वाईन फ्लूचे ९ पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी बुधवार, ५ एप्रिल रोजी न्यू तापडीया नगर भागातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर गुरुवार, १३ एप्रिल रोजी एका मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला.