अकोला, दि. १३- शहर व जिल्हय़ात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, हिवताप, डेंग्यूसदृश आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. या महिन्यात जिल्हय़ात डेंग्यूसदृश आजाराचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न होत असले, तरी ते तोकडे पडत असल्याचे दिसून येत आहे. शहरासह जिल्हय़ात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे आपसूकच डासांची पैदास मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. स्वच्छ पाण्यात ह्यएडीस एजिप्टायह्ण या मच्छरांची पैदास वाढल्याने डेंग्यूचा धोका वाढला आहे. गत काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे सर्दी, पडसे, मलेरिया व डेंग्यूसदृश आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आरोग्य विभागाने ऑक्टोबर महिन्यात ३0 हजार १२३ लोकांच्या रक्तांचे नमुने घेतले. यामध्ये हिवतापाचे आठ रुग्ण आढळून आले, तर नोव्हेंबर महिन्यात अकोट तालुक्यातील कावसा येथील दामोधर व अकोट शहरातील १८ वर्षीय तरुणास डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याचे समोर आले. जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान जिल्हय़ात चिकुनगुनियाचे तीन रुग्ण आढळून आले आहेत.
डेंग्यूसदृश आजाराचे दोन रुग्ण आढळले
By admin | Published: November 14, 2016 3:01 AM