तेल्हारा: अतिक्रमित जागांवरील धार्मिक स्थळे हटवण्याची मोहीमेंतर्गंत तेल्हारा शहरात मंगळवारी दोन धार्मिक स्थळे हटवण्यात आली. चारपैकी दोन स्थळे विश्वस्तांनी स्वत:हून काढली होती. इंदिरा नगरातील मदिना मशीदचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने ते २३ नोव्हेंबर रोजी हटवण्यात येणार आहे.शहरात १ मे १९६० नंतर बांधण्यात आलेली अनधिकृत धार्मिक स्थळे निष्कासित करण्याच्या मोहिमेच्या दृष्टीने नगरपालिकेच्या सभागृहात मुख्याधिकारी मनोहर अकोटकर यांनी विश्वस्तांची एक सभा घेऊन सदर धार्मिक स्थळे स्वत: काढण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार भाजी मंडईमधील हनुमानाची मूर्ती व इतर मूर्ती तसेच खाडे पुºयातील गजानन महाराजांची प्रतिमा स्वत:हून काढण्यात आली. मंगळवारी पिवपळेश्वर हनुमान व माधव नगरातील संत गजानन महाराज मंदिर हटवण्यात आले. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. अनधिकृत धार्मिक स्थळे काढण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे. त्यानुसार शहरासह ग्रामीण भागातील धार्मिक स्थळे काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली. शहरातील इंदिरानगरमध्ये मदिना मशीददेखील यादीत आहे; पण मुस्लीम वक्फ बोर्ड औरंगाबाद यांनी ‘जैसे थे’चा आदेश दिला. त्यामुळे २३ नोव्हेंबर २०१७ नंतर कार्यवाही होणार आहे.
तेल्हाऱ्यात अतिक्रमण केलेल्या जागेवर बांधलेली दोन धार्मिक स्थळे हटवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 4:50 PM
तेल्हारा: अतिक्रमित जागांवरील धार्मिक स्थळे हटवण्याची मोहीमेंतर्गंत तेल्हारा शहरात मंगळवारी दोन धार्मिक स्थळे हटवण्यात आली.
ठळक मुद्देचारपैकी दोन स्थळे विश्वस्तांनी स्वत:हून काढली होती.इंदिरा नगरातील मदिना मशीदचे प्रकरण न्यायप्रविष्ट.२३ नोव्हेंबर २०१७ नंतर कार्यवाही होणार आहे.