अकोला: रामदासपेठ पोलिसांनी बुधवारी रात्री राबविलेल्या कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान विजय नगरातील दोघांकडून दोन तलवारी जप्त करण्यात आल्या. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत निगराणी बदमाशांच्या घरांची झडती घेतली. झडतीदरम्यान विजय नगरात राहणारे भारत श्याम खरे, पिया श्याम खरे या दोघांच्या घरांमध्ये तलवारी ठेवल्या असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून तलवारी जप्त केल्या आणि दोघांना अटक केली. तसेच २२ मार्च रोजी सहा महिन्यांसाठी तडीपार केलेला आरोपी शंकर कसावा हा शहरातच असल्याची रामदासपेठ पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला त्याच्या घरातून अटक केली.
विजयनगरात दोन तलवारी जप्त
By admin | Published: June 17, 2016 2:42 AM