शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

अकोल्यातील रोबोटिक्स प्रशिक्षकाच्या दोन टीम आंतरराष्ट्रीय स्पर्धेत

By admin | Published: April 03, 2017 8:25 PM

२३ ते २५ एप्रिल १७ दरम्यान यूएसएमध्ये सहभागी होणार दोन्ही टीम.

संजय खांडेकरअकोला : अकोल्यातील रोबोटिक्सप्रशिक्षक काजल प्रकाश राजवैद्य यांच्या मुंबईतील दोन टीम आगामी २३ ते २५ एप्रिल १७ दरम्यान यूएसएमध्ये होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय रोबोटिक्सच्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याने अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्या जात आहे. जगभरात रोबोटिक्सचे नवे युग अवतरत आहे. रोबोटिक्सच्या तंत्रज्ञानाचे धडे आता शाळेतून मिळण्याची शक्यता सर्वत्र वर्तविली जात आहे. ही स्थिती देशात असताना अकोल्यातील रोबोटिक्स प्रशिक्षकाची झेप कौतुकास्पद ठरत आहे.वेक्स इंडिया चॅम्पियनशिप दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर रोबोटिक्सच्या स्पर्धा घेत असते. २१ जानेवारी १७ रोजी दिल्ली येथील शिव नादर येथे यंदा या स्पर्धा पार पडल्या. माध्यमिक शिक्षण विभागात घेण्यात आलेल्या ११ टीमच्या स्पर्धेतून मुंबई येथील किड्स इन्स्टिट्यूट शाळेने अजिंक्यपद मिळविले. मास्टर मेन्यूव्हर्स टीमच्या नावाने या शाळेतील आद्य परिवाल, वंश दिवरा, आरव पारेख, वियोग शाह आणि माहिर शाह हे विद्यार्थी सहभागी झाले होते. तर प्राथमिक शिक्षण विभागात घेण्यात आलेल्या दोन टीमच्या स्पर्धेतूनही मुंबई येथील किड्स इन्स्टिट्यूट शाळा अव्वल ठरली. झोटॅक टीमच्या नावाने या शाळेतील तन्मय शाह, माहिर अजमानी, अक्षयन दम्मानी, अनव्ह अग्रवाल हे विद्यार्थी सहभागी झाले होते. मुंबईतील किड्स इन्स्टिट्यूूट शाळेच्या या विद्यार्थ्यांना अकोल्यातील काजल राजवैद्य या रोबोटिक्स प्रशिक्षकाचे मार्गदर्शन लाभले आहे. अकोल्यातील मनुताई कन्या मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या युवतीने बीई, एमई केल्यानंतर रोबोटिक्सचे अद्ययावत धडे घेतले. त्यानंतर रिसोड येथील उद्योजक पुरुषोत्तम अग्रवाल यांनी मुंबईतील विद्यार्थ्यांना रोबोटिक्सचे धडे गिरविण्याची जबाबदारी अकोल्यातील काजलवर टाकली. काजलने मुंबईतील विद्यार्थ्यांना घडवून आधी राष्ट्रीय आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविले आहे. वेक्स रोबोटिक्सची जागतिक चॅम्पियनशिप यूएसएमध्ये होत असून, अकोल्यातील प्रशिक्षक काजलसह मुंबईतील विद्यार्थी २0 एप्रिल १७ रोजी यूएसएकडे रवाना होणार आहेत.