लोकमत न्यूज नेटवर्कहिवरखेड : अडगाव-सिरसोलीदरम्यान २२ ऑक्टोबर रोजी अवैध गौणखनिज चोरून नेत असताना दोन ट्रॅक्टरसह दोघांजणांविरुद्ध हिवरखेड पोलिसांनी कारवाई केली. अडगाव-सिरसोली बोर्डी नदीमधून अवैधरित्या गौणखनिज ट्रॅ क्टर-ट्रॉलीमधून चोरून नेत असल्याची माहिती हिवरखेड पोलिसांना रविवारी मिळाली. त्यावरून ठाणेदार विकास देवरे यांच्या मार्गदर्शनात पांडुरंग राऊत, हवालदार संजय पाटील, आकाश राठोड, संजय महल्ले यांनी नदीपात्रातून अवैध गौणखनिज नेत असताना एमएच ३७ ए ५0८६ व एमएच ३0 डी ३६५ क्रमांकाचे दोन ट्रॅक्टर व ट्रॉलीसह अवैध गौणखनिज असा चार लाख सहा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.