लोहारा-शेगाव दरम्यान शनिवारी दुपारच्या एमएच १९ झेड २९४३ क्रमांकाचा आयशर ट्रक निंबा फाट्याकडून शेगावकडे भरधाव जात असताना, समोरून अकोटकडे कापसाची गठाण घेऊन जाणारा एमएच ०४ सीजी ४५०९ क्रमांकाचा ट्रक भरधाव जात होता. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दोन्ही मालवाहू ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात दोन्ही ट्रकच्या समोरील केबिनची मोठी नासधूस झाली. कापसाची गठाण घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या केबिनची नासधूस झाल्याने, यात ट्रकचा चालक अडकून पडला होता. अथक परिश्रमानंतर ट्रकचालकाला केबिनबाहेर काढण्यात आले. सुदैवाने ट्रकचालकाला किरकोळ दुखापत झाली. अपघातामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक काही तास विस्कळीत झाली होती. उरळ पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून क्रेनद्वारे दोन्ही ट्रक रस्त्याच्या कडेला घेतले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. याप्रकरणी उरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
फोटो: मेल फोटोत