शहरातील दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेसमोर दि. २२ फेब्रुवारी रोजी बँक निरीक्षक अमित वानखडे (रा. अकोला) यांनी दुचाकी उभी केली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लंपास केली. तसेच दि.२४ फेब्रुवारी रोजी दुचाकी चोरी गेल्याची तक्रार शहर पोलीस स्टेशनला प्राप्त झाली आहे. वाढत्या चोरीच्या घटना तेल्हारा पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत आहेत. सोनू रघुनाथ विरघट (२९) (रा. मिलींद नगर, तेल्हारा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते दुचाकी क्रमांक (एमएच ३०, एआर ९९१६)ने लोखंडी रॉड खरेदीसाठी गेले होते. रस्त्यावर दुचाकी उभे करून ते दुकानात गेले होते. काम संपवून परत येताच दुचाकी दिसून आली नाही. अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरल्याची बाब लक्षात येताच त्यांनी तेल्हारा पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक दिनेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली एनपीसी गजानन उर्फ राजू इंगळे पुढील तपास करीत आहेत.
तेल्हारा शहरात दोन दिवसात दोन वाहने चोरीला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 4:25 AM