खेट्री (जि. अकोला): अचानक हरीण आडवे आल्याने दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीवरील चार जण जखमी झाल्याची घटना चान्नी ते वाडेगाव मार्गावरील सुकळी फाट्याजवळ शनिवारी दुपारी घडली.सुकळी येथील डिगांबर ठाकरे (६५) ईश्वर हातोले, मोहित ईश्वर हातोले (८) व शिवम दत्ता ठाकरे (६) हे चौघेजण उपचारासाठी दुचाकीवरून चतारी ग्रामीण रुग्णालयात आले होते. उपचार घेतल्यानंतर परत घरी जात असताना चान्नी वाडगाव मार्गवर सुकळी अचानक हरिण आडवे आल्याने दुचाकी घसरली. या अपघातात चौघेजण जखमी झाले. चतारी येथील रणजीत सदार यांनी पुढाकार घेऊन चारही जखमींना आॅटोमध्ये बसून उपचारासाठी चतारी ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी चौघे जखमीवर प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयअकोला येथे हलविण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती पोलीस पाटील विजय सदार यांनी देताच चान्नी पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले.