मूर्तिजापूर (अकोला): राष्ट्रीय महामार्गावरील बुलढाणा अर्बन गोडाऊन जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीस जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात एक जण ठार झाला, सदर घटना १४ नोव्हेंबर रोजी रात्री ९:३० वाजताच्या दरम्यान घडली, अंकुश गजानन देशमुख(२८) राहणार जामठी बु असे मृतकाचे नाव आहे.
राष्ट्रीय महामार्ग हा जीवघेणा मार्ग झाला असून या महामार्गावर अपघाताची मालिका सुरुच आहे, या रस्त्याची दुर्दशा झाली, चौपदरी कारणाचे काम अत्यंत संथगतीने सुरु असल्याने वाहतुकीस प्रचंड अडचण होत आहे. रविवारी रात्री ९:३० च्या दरम्यान जामठी बु. येथील अंकुश गजानन देशमुख(२८) हा आपल्या दुचाकी क्रमांक एमएच ३० बीजे ४८५१ ने टेशनरी दुकानाचा माल मुर्तिजापूर वरुन विक्रीसाठी घेऊन जात असताना येथील बुलडाणा अर्बन धान्य गोडाऊन जवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघात अंकुश हा गंभीररीत्या जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोसांसह वंचित आपत्कालीन पथकाचे दिपक शेवतकर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून गंभीर जखमी अंकुश यास तातडीने लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले परंतु त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.