मूर्तिजापूर बसस्थानकावर महामंडळ प्रशासनाने भाडेत्तवावर वाहनतळाची व्यवस्था केली आहे. यामध्ये नोकरदार,खाजगी कामे करणारे कामगार, अपडाऊन करणारे शासकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग यांची दुचाकी व इतर अल्प दरात ठेवण्यासाठी वाहनतळ उभारले आहे. पण या वाहनतळाचा आगारातील चालक व वाहक वापर न करता चक्क आपल्या दुचाकी बसस्थानकावर असलेल्या वाहतूक नियंत्रण कक्षासमोरच बिनधास्तपणे उभ्या करून आपल्या नियोजित कामावर निघून जात असल्याचे चित्र आहे. चालक वाहकांच्या दुचाक्या चक्क बसस्थानकाच्या आतमध्ये उभ्या राहत असल्याने इतरही बाहेरील नागरिक आपल्या दुचाकी आतमध्ये ठेवत असल्याचे दिसून आले आहे. याकडे आगारप्रमुख यांनी लक्ष देऊन सर्व चालक वाहकांनी आपल्या दुचाकी बाहेर ठेवण्यासाठी आदेश द्यावे, अशी मागणी होत आहे.
वाहतूक नियंत्रण कक्षासमोरच उभ्या केल्या जातात दुचाकी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 4:20 AM