लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील व्यापारी जुगलकिशोर नवलकिशोर कोठारी याला धनादेश अनादर प्रकरणात पाचव्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शुभदा ठाकरे यांच्या न्यायालयाने दोन वर्ष साधा कारावासाची शिक्षा सुनावली आणि पतसंस्थेला नुकसान भरपाई म्हणून ३५ लाख रुपये देण्याचा आदेश दिला. व्यापारी जुगलकिशोर कोठारी यांनी शहरात मुख्यालय असलेल्या एका पतसंस्थेकडून दहा लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. रक्कम परतफेडीसाठी पतसंस्थेला १७ लाख ६१ हजार रुपयांचा धनादेश दिला होता. परंतु हा धनादेश बँकेत न वटल्याने, तो परत आला. त्यामुळे पतसंस्थेने कलम १३८ नुसार न्यायालयात तक्रार केली. पाचव्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शुभदा ठाकरे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान आरोपी जुगलकिशोर कोठारी याच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने, न्यायालयाने त्याला दोन वर्ष साधा कारावासाची शिक्षा सुनावली आणि त्याला पतसंस्थेला नुकसान भरपाई म्हणून ३५ लाख रुपये देण्याचा आदेश दिला. पतसंस्थेच्यावतीने अँड. श्याम खोटरे यांनी बाजू मांडली.
अकोल्यातील व्यापार्यास दोन वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 1:34 AM
अकोला : शहरातील व्यापारी जुगलकिशोर नवलकिशोर कोठारी याला धनादेश अनादर प्रकरणात पाचव्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शुभदा ठाकरे यांच्या न्यायालयाने दोन वर्ष साधा कारावासाची शिक्षा सुनावली आणि पतसंस्थेला नुकसान भरपाई म्हणून ३५ लाख रुपये देण्याचा आदेश दिला.
ठळक मुद्दे३५ लाख रुपये नुकसान भरपाईचा आदेश