शहरं
Join us  
Trending Stories
1
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
2
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
3
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
4
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
5
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
6
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
7
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
8
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
9
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
10
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
11
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
12
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
13
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
14
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
15
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
16
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
18
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
19
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
20
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ

देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहोचण्यापूर्वीच नागपूर पोलिसांनी नितीन देशमुख यांना घेतलं ताब्यात

By आशीष गावंडे | Published: April 20, 2023 10:40 AM

पिण्याच्या पाण्यासाठी अकोला ते नागपूर पायी मोर्चा

आशिष गावंडे, अकोला: जिल्ह्यातील बाळापुर मतदार संघात खारपानपट्ट्यात समाविष्ट होणाऱ्या 69 गावांमधील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी अकोला ते नागपूर पायी मोर्चा काढणाऱ्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांना नागपूर पोलिसांनी आज सकाळी ताब्यात घेतले. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 69 गावातील पाणीपुरवठा योजनेला स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठविण्यासाठी नितीन देशमुख यांनी अकोला ते नागपूर पायी मोर्चा काढला होता. त्यामध्ये खाऱ्या पाण्याच्या टँकरचा समावेश होता.

पालकमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी खाऱ्या पाण्याची चव घ्यावी व त्यानंतर स्थगिती उठवावी अशी शिवसेनेची मागणी होती. नागपूर येथे जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहोचण्यापूर्वीच नागपूर पोलिसांनी नितीन देशमुख यांना अटक केली.

यामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेचे गटनेता गोपाल दातकर,  शहर प्रमुख (अकोला पूर्व ) राहुल कराळे, उपजिल्हाप्रमुख योगेश्वर वानखडे, दिलीप बोचे, ज्ञानेश्वर म्हैसने यांसह इतर पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी थांबवून ठेवण्यात आल्याची माहिती आहे.

टॅग्स :AkolaअकोलाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv Senaशिवसेना