शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

अखेर अल्पवयीन प्रेमी युगुल पोलिसांच्या ताब्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2016 1:40 AM

देऊळगावराजा येथील घटना; विद्यार्थीदशेतच प्रेमाची झिंग, तीन दिवसांपूर्वी केले होते पलायन.

देऊळगांवराजा (जि. बुलडाणा): प्रेमाची झिंग चढलेले व गेल्या तीन दिवसांपूर्वी पलायन केलेल्या एका अल्पवयीन प्रेमीयुगलाला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. देऊळगावराजा तालुक्यातील देऊळगाव मही या गावातील एका दहावी झालेल्या मुलाचे सध्या दहावीत शिकत असलेल्या एका मुलीशी प्रेमसंबंध जुळले. यातून मग आयुष्यभर सोबतच जगायचे, अशा आणाभाका दोघांनी घेतल्या; मात्र दोघेही एकाच समाजाचे नसल्याने आपल्या प्रेमाला घरातून विरोध होईल, याची त्यांना भीती होती. परिणामी, कुटुंबीयांना काही कळण्यापूर्वीच दोघांनीही मनाचा ठाम निश्‍चय करुन घरातून पलायन करण्याचा निर्णय घेतला. या दोघांनीही २0 मे रोजी एका मित्राच्या मदतीने गावातून पोबारा केला. या मित्राने त्यांना औरंगाबादपर्यंत पोहोचण्यास मदत केली. दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्याचे कळताच तिच्या वडिलांनी शोधाशोध सुरु केली. यानंतर त्यांना या प्रेम प्रकरणाचा सुगावा लागला. त्यांनी लगेच २१ मे रोजी दे.राजा पोलीस स्टेशनला मुलीला पळवून नेल्याची तक्रार केली. या तक्रारीवरून मुलाविरोधात भादंवि ३६३, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणेदार कैलास ओव्हळ यांनी तपासाचे चक्र फिरविले. ओव्हळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बळीराम सांगळे व रवींद्र दळवी यांनी या प्रेमीयुगलाचा मोबाइल ट्रॅकींगच्या साह्याने तपास सुरू केला. या तपासामध्ये हे प्रेमीयुगुल सर्वप्रथम औरंगाबाद तेथून पुण्याकडे गेल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, प्रेमी युगुलामधील मुलाने त्याच्या मित्रासोबत मोबाइलवरून संपर्क केल्यामुळे पोलिसांना त्यांचे ह्यलोकेशनह्ण शोधणे सोपे झाले. हे प्रेमीयुगुल पुण्यावरून पनवेल (मुंबई) कडे रवाना झाले. पनवेल येथील एका अनोळखी इसमाने त्यांना त्यांच्या घरी राहण्यासाठी खोली दिली. दरम्यान, या अल्पवयीन प्रेमीयुगलाचा शोध घेणारे देऊळगावराजा पोलिसांचे पथक पनवेल येथे पोहोचले. त्यांनी या प्रेमीयुगलाला ताब्यात घेऊन २३ मे रोजी देऊळगावराजा येथे आणले. देऊळगावराजा पोलीस स्टेशनमध्ये प्रेमीयुगलाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता, दोघांनीही एकमेकांपासून वेगळे होण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांचेही नातेवाईक परत गेले. दोघेही अल्पवयीन असल्याने त्यांना बुलडाणा विशेष न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती तपास अधिकारी सांगळे यांनी दिली.