अकाेला : "लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळून घेऊ" अशी खुणगाठ मनाशी बाळगून विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेगावात १ जून रोजी विदर्भ आक्रोश मेळावा घेणार असल्याचं सांगण्यात आलेय. यावेळी विदर्भ राज्याच्या निर्मितीकरिता सरकारला सद्बुद्धी दे असे साकडे गजानन महाराजांना घालणार असून शेगावचे आंदाेलन हे येत्या ३१ डिसेंबरपूर्वी ही घोषणा करण्यास राज्यकर्त्यांना भाग पाडावे यासाठी अल्टीमेटम राहिली असा दावा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव चटप यांनी केला.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोअर कमिटीची बैठक येथील विश्रामभवनात मंगळवारी पार पडली त्यांनतर ते पत्रकारांशी बाेलत हाेते. चटप म्हणाले, वेगळा विदर्भ देण्याची सरकाराची इच्छाशक्तीच नाही, वेगळा विदर्भ झाल्यास आपण स्वंयपूर्ण हाेऊ, तेलंगणा, छत्तीसगड हे उत्तम उदाहरणे आहेत असा दावा त्यांनी केला.
सध्या महाराष्ट्र राज्य ६ लाख ६० हजार काेटीच्या कर्जाखाली दबला आहे. अर्थसंकल्प २४ हजार काेटीच्यावर तुटीचा आहे,अशा स्थितीत सिचंनासह इतर विकासकामे हाेऊ शकणार नाहीत असा आराेप त्यांनी केला. कर्नाटक निवडणुकीने भाजपाचा दक्षिण दरवाजा बंद केला आहे, सत्ताधाऱ्याची लाेकप्रियताही घरसत आहे. त्यामुळे २०२४ च्या आधी विदर्भ राज्य द्यावेच लागेल असा दावा चटप यांनी केला आहे. यावेळी रंजना मामर्डे, निलेश पाटील, गजानन अमदाबादकर, लक्ष्मीकांत काैठकर, सुरेश जाेगळे, शंकरराव कवर, सतीश देशमुख, भाऊराव वानखडे प्रशांत भटकर, राजकुमार भट्टड आदी उपस्थित हाेते.