अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील उमा बॅरेजचे काम गत दोन वर्षांपासून बंद पडले असून, पाटबंधारे विभागाने या बॅरेजच्या कंत्राटदारास प्रतिदिन ७0 हजार रुपये दंड सुरू केला आहे. जिल्हय़ात सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी बॅरेज प्रकल्पाचे काम करण्यात येत आहे. जिल्हय़ात चार बॅरेजचे काम करण्यात येत आहे. परंतु मूर्तिजापूर तालुक्यातील बोर्टा गावाजवळ असलेल्या उमा बॅरेजचे ४५ टक्के बांधकाम झाल्यानंतर कंत्राटदाराने हे काम बंद केले आहे. या तालुक्यातील शेती विकासाला चालना देणार्या या प्रकल्पाची किंमत २३७ कोटी आहे. हा प्रकल्प बांधून पूर्ण झाल्यास २0.८0 दशलक्ष घनमीटर जलसाठा संकलित होणार असून, ५,५१0 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. परंतु या बॅरेजचे अर्धेच काम झाले असून, गेटचे कामही रखडले आहे. कंत्राटदाराने हे काम सुरू करावे, यासाठी पाटबंधारे विभागाने पाठपुरावा केला. विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालकापुढे बैठक झाली. यावेळी नोव्हेंबर २0१४ पासून कामाला सुरुवात केली जाईल, याची हमी कंत्राटदाराने दिली होती. तथापि काम सुरू केले नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाने ७0 हजार रुपये प्रतिदिन याप्रमाणे कंत्राटदारावर दंड आकारणी सुरू केली आहे. दरम्यान, अद्यापही काम सुरू न केल्यास करारनामा कलम ३ (क) नुसार कंत्राटदाराकडील उमा बॅरेजचे काम काढून घेण्याची कारवाई होण्याची शक्य ता आहे. शहापूर लपा प्रकल्पाच्या कंत्राटदारावरही पाटबंधारे विभागाने या अगोदर दंडाची व काम काढून घेण्याची कारवाई केली आहे. परंतु, शहापूर लपाचे कंत्राटदाराने न्यायालयात धाव घेतली होती. तथापि तेथेही पाटबंधारे विभागाच्या बाजूने निर्णय झाला असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले. त्यामुळे या कंत्राटदाराची बँक गॅरटी जप्तीची कारवाई होण्याची शक्यता आहे.
उमा बॅरेजच्या कंत्राटदाराला दररोज ७0 हजार रुपये दंड!
By admin | Published: December 04, 2015 2:58 AM