शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

इव्हीएम असेपर्यंत लोकसभा निवडणूक जिंकणे अशक्य - प्रकाश आंबेडकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 7:11 PM

अकोला : इव्हीएमचा खेळ काँगे्रसच्या काळापासून सुरू आहे. काँग्रेसने मशिनचा वापर उमेदवारांना पाडण्यासाठी केला तर आता भाजप उमेदवारांना निवडून ...

अकोला : इव्हीएमचा खेळ काँगे्रसच्या काळापासून सुरू आहे. काँग्रेसने मशिनचा वापर उमेदवारांना पाडण्यासाठी केला तर आता भाजप उमेदवारांना निवडून आणण्यासाठी करीत आहे. राज्याच्या विधानसभा निवडणूकीतही इव्हीएम मॅनेज केल्या होत्या. त्यामुळे अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल पाहावयास मिळाले. मतदान प्रक्रीयेत इव्हीएम असेपर्यंत आपण लोकसभा निवडणूक जिंकू शकत नाही, असेही अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा मेळावात सांगितले.पुढे बोलताना त्यांनी लुटारूंची टोळी असते तशी सत्ताधारांची टोळी आहे. सद्यस्थितीत मोदी आणि इतरांनी ठरवून चाललेला खेळ आहे. मनमोहन सिंग यांच्या काळातील लूट पद्धतशिरपणे होती तर भाजपचे सरकार भुरटे चोर असल्याचा टोलाही त्यांनी येथे लगावला. दोन्ही पक्षांच्या संघटीत टोळी सोबत वंचित बहुजन आघाडीला लढायचे आहे. मतदानात व मोजणीत फरक तसेच इव्हीएमसंदर्भात अकोला जिल्हाधिकारी यांचे पत्र आहे. मात्र, त्यावरही काहीच झाले नसल्याचेही ते म्हणाले. सत्ताधारी चोरांच्या विरोधात लढत आहोत. त्यामुळे भाजपसोबत जायचे ठरविले तरी ते घेणार नाहीत. कारण वंचित बहुजन आघाडीचे ध्येयधोरण कोणते आहे, याची चांगलीच जाणीव त्यांना असल्याने आपल्याला स्वीकारले जात नाही, असेही अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले. हैद्राबादचे डॉक्टर जळीत प्रकरण वेगळे आहे, अनेक गैरप्रकारांची तक्रार तिने केली होती. त्यामुळे या देशात आमच्या विरोधात जाल तर जिवंत राहू शकत नाही, हा प्रकार देशात सुरू झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. अकोला, वाशिम, धुळे, नंदूरबार, नागपूर जिल्हा परिषदांची निवडणूक स्वबळावर लढवू, त्यामध्ये मोठ्या संख्येने उमेदवार विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAkolaअकोलाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी