शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

घरे, विद्युत पोलवर अनधिकृत फायबर आॅप्टीक केबलचे जाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 1:22 PM

अकोला : शहरात महावितरणच्या विद्युत पोलसह काही नागरिकांच्या घरांवर अनधिकृतपणे फायबर आॅप्टीक केबलचे जाळे टाकल्या जात असल्याचा प्रकार गुरुवारी समोर आला.

ठळक मुद्देफायबर आॅप्टीक केबलचे जाळे टाकल्या जात असल्याची तक्रार भारिप-बमसंच्या गटनेत्या अ‍ॅड. धनश्री देव यांनी प्रशासनाकडे केली.मनपाच्या अतिक्रमण विभागासह विद्युत विभागाने गुरुवारी भारत विद्यालयाजवळ सुरू असणाºया अनधिकृत केबलचे कामकाज तातडीने बंद केले. या प्रकरणी फोर-जी केबलचे जाळे टाकणाऱ्या रिलायन्स कंपनीने हात वर केल्याची माहिती आहे.

अकोला : शहरात महावितरणच्या विद्युत पोलसह काही नागरिकांच्या घरांवर अनधिकृतपणे फायबर आॅप्टीक केबलचे जाळे टाकल्या जात असल्याचा प्रकार गुरुवारी समोर आला. महापालिका प्रशासनाने सदर केबलचे जाळे जप्त करण्याची कारवाई केली असून, या प्रकरणी फोर-जी केबलचे जाळे टाकणाऱ्या रिलायन्स कंपनीने हात वर केल्याची माहिती आहे.महावितरण कंपनीचे विद्युत पोल, मनपाचे पथदिवे असणारे खांब तसेच काही नागरिकांच्या इमारतींवर रिलायन्स कंपनीकडून अनधिकृतपणे फायबर आॅप्टीक केबलचे जाळे टाकल्या जात असल्याची तक्रार भारिप-बमसंच्या गटनेत्या अ‍ॅड. धनश्री देव यांनी प्रशासनाकडे केली. नगरसेविका देव यांच्या पत्राची दखल घेत मनपाच्या अतिक्रमण विभागासह विद्युत विभागाने गुरुवारी भारत विद्यालयाजवळ सुरू असणाºया अनधिकृत केबलचे कामकाज तातडीने बंद केले. यावेळी केबल टाकणाºया काही इसमांनी मनपाच्या कर्मचाºयांवर अरेरावी केल्याचा प्रकार दिसून आला. त्यांच्या अरेरावीला न जुमानता मनपा कर्मचाºयांनी केबल जप्त करण्याची कारवाई केली.खासगी व्हेंडरची मनमानीनागरिकांच्या घरापर्यंत फायबर आॅप्टीक केबलचे जाळे टाकण्याचे काम शहरातील अग्रवाल व मित्तल नामक खासगी व्हेंडरने घेतल्याची माहिती आहे. सदर केबलचे जाळे टाकण्यासाठी मनपासह महावितरण कंपनीची परवानगी आवश्यक असून, या दोन्ही यंत्रणांची परवानगी घेण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. सदर व्हेंडर कोण्या कंपनीसाठी केबलचे जाळे टाकत आहेत, त्याचा शोध घेऊन त्यांच्यावर मनपाची दिशाभूल व फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी तक्रार करावी, अशी मागणी समोर आली आहे.रिलायन्सचा सात हजार पोलचा प्रस्तावशहरात फोर-जी सुविधेसाठी केबलचे जाळे टाकणाºया रिलायन्स इन्फोकॉम कंपनीने २० दिवसांपूर्वी मनपाकडे सात हजार पोल उभारण्याचा प्रस् ताव सादर केल्याची माहिती आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५४० पोल उभारल्या जातील. त्या पोलच्या माध्यमातून नागरिकांच्या घरापर्यंत फायबर केबलचे जाळे टाकण्यात येणार आहे. सदर पोलचा मनपाकडून एलईडी पथदिव्यांसाठी वापर केला जाणार आहे. या पोलच्या मोबदल्यात मनपाला महिन्याकाठी आर्थिक स्वरूपात भाडे दिल्या जाणार असल्याची माहिती आहे.शहरात अनधिकृतपणे फायबर आॅप्टीक केबलचे जाळे टाकल्या जात असल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी केबल जप्त करण्यात आले असून, संबंधित खासगी व्हेंडरवर नियमानुसार कारवाई केली जाईल.-जितेंद्र वाघ आयुक्त, मनपा

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका