शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

शेजाऱ्यास अनधिकृत वीजपुरवठा देणे पडू शकते महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2021 4:22 AM

अकोला : स्वत:च्या घरासाठी मंजूर भारानुसार घेतलेल्या वीजपुरवठ्याचा गैरवापर किंवा घरातून शेजाऱ्यास वीजपुरवठा देणेही महागात पडू शकते. भारतीय विद्युत ...

अकोला : स्वत:च्या घरासाठी मंजूर भारानुसार घेतलेल्या वीजपुरवठ्याचा गैरवापर किंवा घरातून शेजाऱ्यास वीजपुरवठा देणेही महागात पडू शकते. भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १२६ नुसार हा गुन्हा ठरत असून, याअंतर्गत संबंधित ग्राहकाविरुद्ध महावितरणकडून दंडात्मक कारवाईही होऊ शकते.

अनेकवेळा विद्युत देयक थकबाकी किंवा अन्य कारणांसाठी महावितरणकडून वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. अशावेळी शेजाऱ्यांकडून वीजपुरवठा जोडून घेतला जातो; मात्र नकळत घडणारा हा प्रकार अंगलट येऊ शकतो. शेजाऱ्यास असा अनधिकृतपणे वीजपुरवठा देणाऱ्यावर कारवाई केली जाऊ शकते. घराला लागूनच दुकान आहे. तिथे स्वतंत्र मीटर न घेता घरातूनच वीजपुरवठा जोडलेला असेल तरीदेखील कारवाईचे प्रावधान आहे. मंजूर भाराव्यतिरिक्त झालेल्या विजेच्या वापराचे मूल्यमापन करून दुप्पट युनिटचे बिल वसूल करण्याची तरतूद आहे.

महावितरणकडून वर्षभरात झालेली कारवाई

जिल्ह्यात वर्षभरात कलम १२६ अंतर्गत केवळ सात कारवाया करण्यात आल्या आहेत. या अंतर्गत ३६,२४९ युनिटचा वापर झालेला आढळून आला. या युनिटचे मूल्यमापन करून दुप्पट दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय वर्षभरात ८७.०७ लाख रुपयांच्या ३४० वीजचोरी उघड झाल्या असून, कलम १३५ अंतर्गत कारवाई करण्यात आल्या आहेत.

कायदा काय सांगतो?

विद्युत कायदा २००३ मधील कलम १२६ नुसार शेजाऱ्यांकडून अनधिकृत पद्धतीने वीजपुरवठा घेणे, मंजूर वर्गवारीतून इतर वर्गवारीसाठी अनधिकृत वीज वापर केल्याप्रकरणी कारवाई केली जाऊ शकते. यासह मीटरशी छेडछाड, आकडा टाकून वीज वापर, सर्व्हिस वायर टॅप केल्यास कलम १३५ नुसार कारवाई केली जाते.

चोरी कळवा, दंडातील १० टक्के रक्कम बक्षीस मिळवा

२००३ मध्ये तयार झालेल्या विद्युत कायद्यामध्ये महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. वाढत्या वीजचोरीला आळा घालण्याकरिता ‘वीजचोरी कळवा, बक्षीस मिळवा’, ही अभिनव योजनाही हाती घेण्यात आली आहे.

याअंतर्गत वीजचोरीची माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जातात. एवढेच नव्हे तर संबंधितास वीज चोराकडून वसूल करण्यात आलेल्या दंडातील १० टक्के रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते.

वीज ग्राहकाने मीटरवर मंजूर भाराएवढाच अर्थात ज्या कारणासाठी वीजपुरवठा घेतला आहे तेवढाच वीज वापर करणे अपेक्षित आहे. घरगुती वीजपुरवठ्याचा वापर दुकान, पीठगिरणीसाठी करणे किंवा शेजाऱ्याला वीजपुरवठा देणे हा कलम १२६अंतर्गत गुन्हा ठरतो. असे करणाऱ्यांवर महावितरणकडून कारवाई करण्यात येते.

- पवनकुमार कछोट, अधीक्षक अभियंता, अकोला मंडळ, महावितरण