मेहकर, दि. २४- २३ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल लागले. यावेळी शिवसेनेच्या एका जि.प. सदस्याने पोलीस स्टेशनची परवानगी नसताना गावामध्ये विजयी मिरवणूक काढली. त्यामुळे पोलिसांनी १९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.बोरी ता.मेहकर येथील मनीषा संतोष चनखोरे या शिवसेनेच्या तिकिटावर जिल्हा परिषद सोनाटी सर्कलमधून विजयी झाल्या. त्यामुळे विजयाचा आनंद म्हणून संतोष चनखोरे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी बोरी गावामध्ये विजयी मिरवणूक काढली होती. दरम्यान, पोलीस स्टेशनची परवानगी नसताना सदर मिरवणूक काढून कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी, पोलिसांनी संतोष जनार्दन चनखोरे, किशोर चनखोरे, महेश चनखोरे, निकलेश बचाटे, शेखर आव्हाळे, भागवत चनखोरे, रामदास चनखोरे, स्वप्निल नरवाडे, ओमप्रकाश चनखोरे, प्रकाश बचाटे, नामदेव बचाटे, अनिल चनखोरे, रणजित नखाते, बबन ऊर्फ गजानन चनखोरे, मदन चनखोरे, सचिन चनखोरे, अनंता चनखोरे, ज्ञानेश्वर ढेंगळे, देवीदास चनखोरे यांचेविरुद्ध फिर्यादी पोउनि रामप्रसाद चामलाटे यांचे फिर्यादीवरुन अप नं.३८/१७ कलम १३५ मुपोकॉ व १८८ भादंवि नुसार गुन्हा दाखल केला आहे.
विनापरवाना मिरवणूक; १९ जणांविरुद्ध गुन्हे
By admin | Published: February 25, 2017 2:09 AM