शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

अघोषित भारनियमन, कृषी पंपांचा वीज पुरवठाही विस्कळीत

By admin | Published: October 07, 2014 1:57 AM

अकोला जिल्ह्याचे चित्र, मात्र विक्रमी वीज पुरवठा केल्याचा महावितरणचा दावा.

अकोला : गत पंधरा दिवसांपासून राज्यात अघोषित भारनियमन करण्यात येत आहे. कृषी पंपांचा वीज पुरवठा तासन्तास बंद असतो. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले असताना, महावितरण मात्र ३६४.५७ लाख युनिटचा वीज पुरवठा करून विक्रम केल्याची बतावणी करीत आहे.महावितरणने ५ ऑक्टोबर २0१४ रोजी तब्बल ३६४.५७ दशलक्ष युनिट वीज पुरवठा करण्याचा विक्रम केला. २९ सप्टेंबर २0१४ रोजी महावितरणने ३६२ दशलक्ष युनिट वीज पुरविली होती. १ ऑक्टोबर २0१४ पासून महावितरणने दसरा वगळता रोज १६000 मेगावॅटपेक्षा जास्त वीज पुरविलेली आहे. गत पंधरा दिवसांपासून राज्यात मोठय़ा प्रमाणात भारनियमन करण्यात येत आहे. भारनियमनाने जनता त्रस्त झाली आहे. सध्या पाऊस नसल्यामुळे पिकांची अवस्था दयनीय झाली आहे. पिकांना पाण्याची नितांत गरज असताना, अतिरिक्त भारनियमनामुळे कृषिपंपांना तासन्तास वीज मिळत नाही. अनेक शेतांमध्ये सिंचनाची सोय आहे; मात्र भारनियमनामुळे पाणी असल्यावरही शेतकरी सिंचन करू शकत नाही. परिणामी त्रस्त झालेले शेतकरी महावितरणच्या कार्यालयावर धडक देत आहेत. गत आठ दिवसात एकट्या अकोला जिल्ह्यातील दहा ते पंधरा गावातील शेतकर्‍यांनी महावितरणकडे भारनियमन बंद करण्याची मागणी केली. त्यासाठी काही कार्यालयांमध्ये तोडफोडही झाली आहे. दिनांक            विजेची मागणी              वीज पुरवठा                      भारनियमन ५-१0-१४                १७,१२३ मे.वॅ.              १६,७0५ मे.वॅ.                ४१८ मे.वॅ.४-१0-१४                १७,६९४ मे.वॅ.              १६,७२१ मे.वॅ.                ९७३ मे.वॅ.३-१0-१४                १५,१५९ मे.वॅ.              १५,0१८ मे.वॅ.                 १४१ मे.वॅ.२-१0-१४                १६,२0४ मे.वॅ.              १६,0९९ मे.वॅ.                 १0५ मे.वॅ.१-१0-१४                १६,८१३ मे.वॅ.               १६,२७८ मे.वॅ.                 ५३५ मे.वॅ.