अकोला: सुशिक्षित बेरोजगार युवकांना भूलथापा देऊन समाजकल्याण विभागाच्या आश्रमशाळांमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ५५ लाख रुपयांनी आर्थिक फसवणूक करणाऱ्या चौघांविरुद्ध खदान पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. आरोपींनी जिल्ह्यातील अनेक युवकांची तब्बल एक कोटी रुपयांच्यावर फसवणूक केली आहे. दररोज फसवणुकीच्या तक्रारी खदान पोलीस ठाण्यात दाखल होत आहेत. पोलिसांनी बनावट कागदपत्रे बनविणाºया रेहान खान यास ताब्यात घेतले आहे.खडकीतील आरोपी प्रवीण सुरवाडे, नीतेश खिल्लारे, बळीराम गवई आणि संध्या सुरवाडे यांनी ग्रामीण भागातील अनेक युवकांना समाजकल्याण विभागाच्या आश्रमशाळांमध्ये लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले आणि अनेकांकडून ५५ लाख रुपये लाटले. एवढेच नाही, तर या युवकांना मंत्रालयातून बनावट आॅर्डरसुद्धा आणून दिल्या. संबंधित युवक रुजू होणाºया ठिकाणी गेले असता, त्या ठिकाणी कोणतीही आश्रमशाळा नसल्याचे दिसून आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर युवकांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या. पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुख्य आरोपी प्रवीण सुरवाडे, नीतेश खिल्लारे यांना अटक केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींनी फसवणूक केल्याच्या आणखी काही तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल होत आहेत. शुक्रवारी डाबकी रोडवरील प्रशीक शिवचरण सिरसाट याने आरोपींनी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सात लाख रुपयांनी फसवणूक केल्याची तक्रार खदान पोलीस ठाण्यात दिली. सोबतच त्याने आरोपीने दिलेली बनावट आॅर्डरसुद्धा तक्रारीसोबत जोडली आहे. बनावट आॅर्डरवर राजमुद्रेचा गैरवापरआरोपींनी मंत्रालयातून आॅर्डर निघत असल्याने राजमुद्रा असलेली मंत्रालयाची कागदपत्रे आणि आॅर्डरवर राजमुद्रा वापरून गैरवापर केला. त्यामुळे आरोपींवर राजमुद्रेचा गैरवापर केल्याबद्दल कायद्यात गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे.