मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्गावरील आसरा फाटा नजीक उभ्या अॉटोला पाठी मागून धडक दिल्याने अॉटो मध्ये बसल्या प्रवाशांपैकी एक जण ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला. तर एक किरकोळ जखमी झाल्याची घटना ३० डिसेंबर रोजी संध्याकाळी ७:३० वाजताच्या सुमारास घडली. मूर्तिजापूर येथून माना येथे आठ ते १० प्रवाशी घेऊन जात असलेल्या अॉटो क्रमांक एमएच ३० एए १४६८ मधली अचानक वायरिंग जळाल्याने धुर निघाला चालक राजू चक्रे याने आपले वाहन थांबवून इतर प्रवाशांना खाली उतरवून राजू चक्रे (वय वर्षे २८), अनिल गोपाल कोकणे (वय वर्षे ४८) व दिनेश गंगाधर ढवळे (वय वर्षे ३४) राहणार माना हे तीघे वायरिंग तपासत असताना पाठी मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अनिल गोपाल कोकणे हा ठार झाला, तर अॉटो चालक राजू चक्रे हा गंभीररीत्या जखमी झाला आहे. त्याचेवर अकोला येथे उपचार करण्यात येत आहे तर दिनेश गंगाधर ढवळे हा किरकोळ जखमी झाला आहे. इतर महिला प्रवाशी महामार्गाच्या कडेला बसले असल्याने मोठा अनर्थ टळला. धडकेने अॉटो रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन उलटला. दिनेश ढवळे याच्या फिर्यादी वरुन शहर पोलीसांनी अज्ञात वाहना विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक संगीता गावडे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश उमक करीत आहे.
उभ्या ऑटोला अज्ञात वाहनाची धडक, एक ठार, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 2:01 PM