लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : लोकमत सखी मंचद्वारे बुधवारी सकाळी अनोखा रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला. वाहतूक शाखेच्या कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात लोकमत सखी मंचच्या विभागप्रमुख व सदस्यांनी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांना राखी बांधली. यावेळी पोलीस अधीक्षक कलासागर यांनी जिल्हय़ातील महिला व युवतींच्या सुरक्षिततेची जबाबदारी एक भाऊ या नात्याने आपल्यावर आली असल्याचे स्पष्ट करीत सर्वांना कुठेही अनुचित प्रकार दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.लोकमत सखी मंचच्या विभागप्रमुख महिलांद्वारे बुधवारी सकाळी वाहतूक शाखेच्या कार्यालयात रक्षाबंधन कार्यकम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी उपस्थिती लावली. त्यानंतर वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील यांनाही सखी मंचच्या विभागप्रमुखांनी राखी बांधून सुरक्षित वाहतुकीसाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. त्यानंतर खदानचे ठाणेदार गजानन शेळके यांना राखी बांधून येथील कर्मचार्यांना राखी बांधत अनोखे रक्षाबंधन साजरे केले. यावेळी वाहतूक शाखेच्या तब्बल ५0 च्यावर पोलीस कर्मचार्यांना राखी बांधून कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना बहिणीची उणीव भासणार नाही, याचे आश्वासन दिले. लोकमत सखी मंचद्वारे पोलीस अधिकारी व कर्मचार्यांसोबत आयोजित केलेल्या या अनोख्या रक्षाबंधनाचे कौतुक पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी केले.
लोकमत संखी मंचद्वारे अनोखे रक्षाबंधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 2:06 AM
अकोला : लोकमत सखी मंचद्वारे बुधवारी सकाळी अनोखा रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला. वाहतूक शाखेच्या कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात लोकमत सखी मंचच्या विभागप्रमुख व सदस्यांनी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांना राखी बांधली. यावेळी पोलीस अधीक्षक कलासागर यांनी जिल्हय़ातील महिला व युवतींच्या सुरक्षिततेची जबाबदारी एक भाऊ या नात्याने आपल्यावर आली असल्याचे स्पष्ट करीत सर्वांना कुठेही अनुचित प्रकार दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
ठळक मुद्देपोलीस अधीक्षक राकेश कलासागर व पोलीस अधिकार्यांना बांधल्या राखी