शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

फौजदारी कारवाई झालेल्या तलाठ्यांना नियमबाह्य पदस्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2020 2:03 PM

मंगरुळपीरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांना पुन्हा तलाठी पदावर पदस्थापना देण्याचे आदेश काढले आहेत.

- दादाराव गायकवाड लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: मानोरा तहसील कार्यालयांतर्गत कार्यरत तलाठ्यांवरील फौजदार प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल अप्राप्त असतानाही कारंजा उपविभागाचा प्रभार सांभाळत असलेल्या मंगरुळपीरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांना पुन्हा तलाठी पदावर पदस्थापना देण्याचे आदेश काढले आहेत. विशेष म्हणजे, श्रेणी ३ च्या तलाठ्यांची बदली करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनाच असताना त्यांनी ही प्रक्रिया पार पाडत, जिल्हाधिकाºयांच्या अधिकारावर अतिक्रमणच केल्याचे स्पष्ट होत आहे.प्राप्त माहितीनुसार कारंजा उपविभागांतर्गत विविध ठिकाणी कार्यरत चार तलाठ्यांना २००९ ते २०१४ या कालावधीत फौजदारी प्रकरणात निलंबित करण्यात आले होते. त्यात दिलिप अंगाईतकर, निलेश कांबळे, व्ही.एम. भोयर आणि एस. डी. महाजन यांचा समावेश होता. दिलिप अंगाईतकर, यांच्यावरील खटल्याचा २९ जुलै २०१६ रोजी निकाल लागला, तर निलेश कांबळे यांच्यावरील खटल्याचाही निकाल लागला. हे चारही तलाठी सध्या कारंजा येथील तहसील कार्यालयात अकार्यकारी पदावर कार्यरत आहेत. तथापि, व्ही.एम. भोयर आणि एस. डी. महाजन यांच्यावरील खटल्याचा चौकशी अहवाल २४ फेब्रुवारी २०२० पर्यंत अप्राप्त असून, शासनाच्या १४ आॅक्टोबर २०११ च्या निर्णयातील परिच्छेद ५ नुसार फौजदारी कारवाई झालेल्या तलाठ्यांना (शासकीय कर्मचारी) संबंधित प्रकरणाचा खटला, अपिल, विभागीय चौकशीचा निकाल लागेपर्यंत अकार्यकारी व जनसंपर्क येणार नाही, अशाच पदावर पदस्थापना देण्याची खबरदारी ठेवणे आवश्यक आहे; परंतु कारंजा उपविभागाचा प्रभार सांभाळत असलेल्या मंगरुळपीर उपविभागीय अधिकाºयांनी या तलाठ्यांना २७ फेब्रुवारी रोजी तलाठी पदावर पदस्थापना देण्याचे आदेश पारित केले. विशेष म्हणजे ज्या तालुक्यात कार्यरत असताना या तलाठ्यांवर फौजदारी प्रकरणात निलंबनाची कारवाई झाली.त्याच तालुक्यात व्ही. एम. भोयर आणि एस. डी. महाजन यांना पदस्थापना दिली आहे. त्यातच वर्ग ३ मध्ये मोडणाºया कर्मचाºयांच्या बदलीचे अधिकार उपविभागीय अधिकाºयांना नसल्याचा निर्वाळा ‘मॅट’ने काही महिन्यांपूर्वी दिला असतानाही प्रभारी उपविभागीय अधिकाºयांनी या तलाठ्यांना पदस्थापना देत जिल्हाधिकाºयांच्या अधिकारांवर अतिक्रमण केले.

या प्रकरणाची विस्तृत माहिती नाही. त्यामुळे सर्व प्रकरणाची शहानिशा करून झालेली प्रक्रिया चुकीची असेल, तर ती रद्द करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

तलाठ्यांची नियुक्ती, बदलीबाबत नियुक्ती प्राधिकारी म्हणून आम्हाला अधिकारी आहेत, शिवाय पदस्थापना देताना नियमांचे उल्लंघनही करण्यात आले नाही. -जयवंत देशपांडे,प्रभारी उपविभागीय अधिकारी, कारंजा

टॅग्स :washimवाशिम