लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पावसाच्या पाण्याने खांबोराजवळील उन्नई बंधारा काठोकाठ भरला असल्याने, खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना गत १० दिवसांपासून ‘उन्नई’ बंधाºयातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.महान येथील काटेपूर्णा धरणातूनअकोला शहर व खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो; परंतु महान येथील काटेपूर्णा धरणात १७ आॅगस्ट रोजी सायंकाळपर्यंत ८.२० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याच्या पृष्ठभूमीवर या धरणातून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. गत १५ दिवसांत पडलेल्या पावसाचे पाणी खांबोराजवळील उन्नई बंधाºयात साचले आहे. पावसाच्या पाण्याने बंधारा काठोकाठ भरल्याने, गत १० दिवसांपासून उन्नई बंधाºयातून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यानुषंगाने या बंधाºयातील पाण्यावर ६४ गावांमधील ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे.
बंधाºयात महिनाभर पुरेल एवढे पाणी!पावसाच्या पाण्याने उन्नई बंधारा भरल्यानंतर या बंधाºयातून ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना या बंधाºयातून सध्या आठ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असून, संबंधित गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी एक महिनाभर पुरेल एवढा जलसाठा उन्नई बंधाºयात उपलब्ध आहे.