अकोला: महापालिका कर्मचार्यांच्या थकीत वेतनाच्या समस्येने पुन्हा एकदा डोके वर काढले असून तीन महिन्यांचे वेतन थकीत असल्यामुळे मनपा कर्मचारी संघर्ष समितीने संपाचे हत्यार उपसले आहे. बुधवारपासून महापालिकेचे कामकाज बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय संघर्ष समितीने सोमवारी जाहीर केला.मनपा क्षेत्रासाठी स्थानिक स्वराज्य संस्था कर लागू झाल्यानंतर मनपाने दर महिन्याला चार ते साडेचार कोटी रुपये ह्यएलबीटीह्ण वसूल केला होता. यामुळे मनपा कर्मचार्यांच्या वेतनाची समस्या निकाली निघाली होती. अवघ्या वर्षभरात शासनाने एलबीटी रद्द केल्यामुळे मनपाच्या प्रमुख उत्पन्नाचा मार्ग बंद पडला. एलबीटीच्या बदल्यात शासनाने महिन्याला ४ कोटी २२ लाख रुपये देऊ करण्याची भूमिका घेतली होती. नंतर मात्र एलबीटीच्या अनुदानात कपात केल्यामुळे कर्मचार्यांच्या वेतनाची समस्या पुन्हा निर्माण झाली आहे. तूर्तास कर्मचार्यांचे तीन महिन्यांचे वेतन थकीत असून चौथ्या महिन्याला सुरुवात झाली आहे. थकीत वेतनाच्या मुद्यावर तोडगा काढण्यात प्रशासन अपयशी ठरल्याने अखेर मनपा कर्मचारी संघर्ष समितीने बुधवारपासून कामबंद आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.
संप अटळ; उद्यापासून महानगरपालिका ठप्प!
By admin | Published: May 24, 2016 1:40 AM