संतोष येलकरअकोला, दि. १0 : जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत गत जुलैमध्ये जिल्ह्यातील गावागावांत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात पाणी नमुने घेण्यात आले. पाणी नमुने तपासणीच्या अहवालानुसार १२0 गावांमध्ये १५९ पाणी नमुने दूषित आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील १२0 गावांतील पाणी पिण्यास अयोग्य असल्याची बाब समोर आली आहे.जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत आरोग्य कर्मचार्यांकडून जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाश्रीटाकळी, बाळापूर, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यात ३0 प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ८२९ गावांमध्ये पाणीपुरवठय़ाच्या स्रोतांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये संबंधित गावांमध्ये ९८३ पाणी नमुने घेण्यात आले. पाणी नमुने तपासणीचा अहवाल प्रयोगशाळेमार्फत जुलैअखेर जिल्हा परिषद आरोग्य विभागाला प्राप्त झाला. त्यानुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यात १२0 गावांमध्ये १५९ पाणी नमुने दूषित आढळून आले. त्यामुळे पाणी नमूने दूषित आढळून आलेल्या १२0 गावांमध्ये पिण्याचे पाणी अयोग्य असल्याची बाब समोर आली आहे.दूषित पाणी नमुने आढळलेली गावे!तालुका गावे अकोला ४८ आकोट 0९ बाळापूर १५बाश्रीटाकळी 0९मूर्तिजापूर १0पातूर २१तेल्हारा 0८...................एकूण १२0अशी आहेत दूषित पाण्याचे नमुने!जिल्ह्यातील १२0 गावांमध्ये १५९ पाणी नमुने दूषित आढळून आले. त्यामध्ये अकोला ५५, बाश्रीटाकळी ३0, आकोट ८, तेल्हारा १0, बाळापूर २0, पातूर २३ व मूर्तिजापूर तालुक्यात १३ पाणी नमुने दूषित आढळून आले.
अकोला जिल्ह्यात १२0 गावांतील पाणी पिण्यास अयोग्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2016 1:48 AM