डासांचा प्रादुर्भाव वाढला
अकोला: शहरातील विविध भागांत डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने, आरोग्यविषयक समस्या उद्भवत आहेत. डासांचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी नागरिकांनी घरातील पाण्याचे भांडे नियमित धुवावे, तसेच मच्छरदानीचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
वातावरणातील बदलांचा चिमुकल्यांच्या आरोग्याला फटका
अकोला : गत आठवड्यापासून जिल्ह्यातील वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे चिमुकल्यांच्या आरोग्याला फटका बसत आहे. अनेकांना सर्दी, खोकल्यासह तापाचे आजार झाल्याचे दिसून येत आहे. गत काही दिवसांपासून शहरातील रुग्णालयात बाल रुग्णांची संख्या वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.
विनामास्क बसमध्ये दिला जातोय प्रवेश
अकोला: कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी एसटी महामंडळातर्फे जनजागृती म्हणून एसटी बसेसवर ‘नो मास्क, नो एन्ट्री’ अशी जाहिरात करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही बसमध्ये प्रवाशांना विनामास्क प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे ही जनजागृती केवळ नावालाच होत असून, त्यावर प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसून येत नाही.
मनोहर इंगळे ‘शांतिदूत’ पुरस्काराने सन्मानित
अकोला: पुणे येथील शांतिदूत परिवारातर्फे मनोहर इंगळे यांना ‘शांतिदूत सेवा रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या समाजिक कार्याची दखल घेत, आंतरराष्ट्रीय शांतिदूत परिवाराचे डॉ.विठ्ठल जाधव व शांतिदूत परिवाराच्या अध्यक्षा विद्याताई जाधव यांच्या हस्ते त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.