-------
शेतकऱ्यांच्या भरवशावर हंगाम
अकोला : सर्वाधिक बियाणे हे शेतकऱ्यांनी स्वत:कडे राखून ठेवले असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात सव्वा ते दीड लाख क्विंटलच्या जवळपास बियाणे शेतकऱ्यांकडे असल्याचे सोयाबीन बियाणांच्या नियोजनात देण्यात आले आहे.
----
कार्यालयातील तक्रारपेट्या गायब
तेल्हारा : शासकीय कार्यालयात काही वर्षांपूर्वी तक्रारपेट्या लावण्यात आल्या होत्या. मात्र, बहुतांश कार्यालयातील तक्रारपेट्या गायब झाल्या आहेत. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन तक्रारपेट्या बसविण्याची मागणी होत आहे.
-----
अकोट तालुक्यात ५० पॉझिटिव्ह
अकोट : जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बुधवारी प्राप्त अहवालानुसार, तालुक्यात ५० जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
-------------------------------
व्यायामशाळा उभारण्याची मागणी
अकोला : अकोट व तेल्हारा तालुक्यांतील काही गावांत व्यायामशाळा नाहीत. व्यायामशाळा मंजूर करण्याची मागणी युवकांमधून होत आहे. व्यायामशाळा नसल्याने युवकांना व्यायाम करण्यासाठी रस्त्यावर जावे लागते. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
----------------------------
डिझेल दरवाढीचा शेतकऱ्यांना फटका!
हिवरखेड : वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या दराचा शेतकऱ्यांनाही फटका बसत आहे. महागाईमध्ये शेतकरी होरपळून निघत आहे. ट्रॅक्टरमालकांनी शेती मशागतीचे दर वाढविले आहेत. सध्या पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत. ही कामे करण्याकरिता शेतकऱ्यांना अवास्तव पैसे माेजावे लागत आहेत.
-----------------------------
लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहन
पातूर : दहा वर्षांआतील मुलांनादेखील कोरोना संसर्ग होण्याचा धोका असून, पालकांनी लहान मुलांना जपावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले. पाल्याला कोरोना संसर्ग होणार नाही, याची दक्षता पालकांनी घ्यावी, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला.