शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

अकोला जिल्ह्यात वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस

By रवी दामोदर | Updated: May 18, 2024 21:21 IST

केळीसह ज्वारी पिकाचे नुकसान : काही भागात गारपीट.

अकोला : जिल्ह्यात  शनिवारी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तर काही गावात गारपीट झाली. यामध्ये घर, जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.गत दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. त्यानुसार, सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. 

जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. अकोटात चांगला पाऊस बरसल्याने सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे काही भागात वाहतूक ठप्प झाली होती. सकाळी प्रखर ऊन तापल्यानंतर दुपारी अचानक वातावरणात बदल झाला व जोरदार वादळ आले. धुळीचे लोट उडाले, मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. वादळात काही घरावरील टिनपत्रे उडाली. अकोट तालुक्यातील अनेक गावात गारपीटचा तडाखा बसला. ग्रामीण व शहरी भागात आकाशात टीनपत्रे उडून जाताना दिसून येत होते. या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे व गोरगरिबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.--------------------------------तेल्हारा तालुक्यात ज्वारी पिकाची नासाडीतेल्हारा तालुक्यात मागील आठवड्यापासून तीन वेळा वादळ वाऱ्यासह पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास पुन्हा वादळवाऱ्यासह पावसाने चांगलेच नुकसान झाले. तालुक्यातील वरुड बिहाडे, राणेगाव भोकर परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने ज्वारी पिकाचे नुकसान झाले. --------------------------------रुईखेड परिसरात केळी पिकांचे नुकसानअकोट तालुक्यातील रुईखेड परिसरात वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचे अतोनात नुकसान झाले. उभी केळी पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.-----------------------------------वरूर जऊळका येथे तासभर पाऊसवरूर जऊळका : खारपाणपट्ट्यातील वरूर जऊळका येथे १८ मे रोजी दुपारी विजेच्या कडकडाटात वादळवाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. सतत तासभर रिमझिम पाऊस सुरू होता. शनिवारी गावातील बाजार असल्याने अचानक आलेल्या पावसामुळे विक्रेते, ग्राहकांची तारांबळ उडाली होती. तसेच नेहमीप्रमाणे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. सावरा विद्युत केंद्राअंतर्गत येणाऱ्या या गावांमध्ये थोडा फारही पाऊस आला तर विद्युत पुरवठा बंद पडतो. त्यामुळे ग्रामस्थांना अडचणीचा सामना करावा लागतो.

टॅग्स :Akolaअकोला