अकोला : जिल्ह्यातील काही भागात मंगळवारी दुपारी अचानक वादळी वारा,गारपीटीसह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. पातूर तालुक्यातील पळसखेड येथे अंगावर वीज कोसळून एका महिलेचा घटनास्थळावच मृत्यू झाला.तरअनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडाली, काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीला खोळंबा झाला.
जिल्ह्यात सोमवार,१५ एप्रिलपासूनच ढगाळ वातावरण आहे.मंगळवारी दुपारी ३ वाजतानंतर आकाश ढगांनी भरू न आले. अकोला शहरातील काही भागात,कृषी विद्यापीठ परिसरात गाराचा पाऊस पडला. बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद बु येथे वादळासह जोरदार गारपीट झाली.अचानक आलेल्या पावसामुळे दोनद येथील यात्रा महोत्सवात आलेल्या भाविकांची एकच तारांबळ उडाली. पातूर शहर व तालुक्यात पळसखेड व काही ठिकाणी वादळी वाºयासह पाऊस बरसला.पळसखेड येथे महिलेच्या अंगावर वीज कोसळून जागीच मृत्यू झाला. तसेच वादळामुळे अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडाली. तसेच झाडे उन्मळून पडली.
मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, पातूर तालुक्यात काही ठिकाणी गारपीट तर अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. वादळामुळे तिन्ही तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.