शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

मूर्तिजापुरातील कोविड केअर सेंटरमधील खाटांवर बेवारस श्वानांचा आराम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 10:42 AM

येथील खाटांवर बेवारस कुत्र्यांचा वावर असून, रुग्णांच्या खाटांवर कुत्रे आराम करीत असल्याची गंभीर बाब रविवारी समोर आली आहे.

- संजय उमक लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर: कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संदिग्ध रुग्णांना दाखल करण्यात येते. या ठिकाणी रुग्णांना पोषक वातावरण, सर्व सुविधा उपलब्ध असाव्यात, असा नियम आहे; परंतु मूर्तिजापुरातील हेंडज कोविड केअर सेंटर असुविधांच्या विळख्यात सापडले आहे. येथील खाटांवर बेवारस कुत्र्यांचा वावर असून, रुग्णांच्या खाटांवर कुत्रे आराम करीत असल्याची गंभीर बाब रविवारी समोर आली आहे.कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येणाऱ्या रुग्णांना शुद्ध पाणी, स्वादिष्ट जेवणासोबतच प्रसन्न वातावरण असणेही गरजेचे आहे आणि या सर्व सुविधा स्थानिक प्रशासनाने पुरविणे बंधनकारक आहे; परंतु प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. मूर्तिजापुरातील हेंडज शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या इमारतीमधील कोविड केंअर सेंटरची दुरवस्था झाली असून, येथील खोल्यांची खिडक्या, दारे तुटलेली आहेत. शौचालय, स्वच्छतागृहांमध्ये घाण साचली आहे. रुग्णांना दिलेल्या खोल्यांमधील खाटांवर बेवारस कुत्री आराम करीत असल्याचे चित्र रविवारी दिसून आले.सेंटरमध्ये विविध समस्या असून, ठिकठिकाणी अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे येथे क्वारंटीन असलेले संदिग्ध रुग्ण कासावीस झाले आहेत. अस्वच्छ वातावरणात त्यांना येथे राहावे लागत असल्याने, अनेकांनी सुविधेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.या ठिकाणी संदिग्ध रुग्णांची प्रकृती बरी होण्याऐवजी येथील दूषित वातावरणामुळे आणखी बिघडण्याची शक्यता आहे. येथील खोल्यांची दारे, खिडक्या तुटलेल्या असल्यामुळे येथील महिला रुग्ण व पुरुषांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने कोविड केंअर सेंटरची पाहणी करून या ठिकाणी स्वच्छतेसह सुविधा रुग्णांना पुरविण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी रुग्णांनी केली आहे.क्वारंटीन असलेल्या काही लोकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केले. त्यात तथ्य नाही. रविवारी सकाळी हेंडज क्वारंटीन सेंटरला भेट दिली असता, सर्व सुविधा असल्याचे रुग्णांनी सांगितले. सर्व सुविधा रुग्णांना दिल्या जात आहेत. दररोज क्वारंटीन कक्षाची स्वच्छता करण्यात येते.- प्रदीप पवार, तहसीलदार, मूर्तिजापूर

हेंडज कोविड केअर सेंटरमध्ये अस्वच्छता आहे. बेवारस कुत्रे खोल्यांमध्ये घुसत आहेत. या ठिकाणी प्रशासनाने संदिग्ध रूग्णांना सुविधा पुरविण्याची गरज आहे. याबाबत विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.-राजेंद्र मोहोड, सामाजिक कार्यकर्ते

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याMurtijapurमुर्तिजापूर