अकोला : हवामान विभागाच्या अंदाजानुसार मंगळवार, २८ डिसेंबर रोजी दुपारी २ च्या सुमारास जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी बहुतांश ठिकाणी गारपीट झाल्याने काढणीस आलेल्या तूर पिकाचे नुकसान झाले. तर रब्बीचा हरभरा, कांदा, गहू व भाजीपालासह इतर पिकांनाही फटका बसला आहे.पावसाळा संपल्यानंतरही हिवाळ्यात अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने बळीराजा मेटाकुटीला आला आहे. त्यातच मंगळवारी दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस व गारपीट यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये रब्बीच्या हरभरा, कांदा, गहू, भाजीपाला पिकाला फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांची तूर काढणीला आलेली आहे. या पिकालाचेही अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे पुरते मोडले गेले.
तासभरात बरसला ३७.३ मिमी पाऊस
अकोला जिल्ह्यात मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. जवळपास तासभर हा पाऊस बरसला. अकोला शहरातसह परिसरातील मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. मंगळवारी सायंकाळपर्यंत ३७.३ मिमी पावसाची
विद्युत तारा तुटल्या, झाडे कोलमडली!
वादळी पावसामुळे अकोला शहरातील खदान, वाशीम बायपाससह अनेक भागांत विद्युत तारा तुटल्या. काही ठिकाणी झाडे कोलमडली आहे. तसेच ग्रामीण भागातही हीच स्थिती पहावयास मिळाली.
रस्त्यावर तुंबले पाणी
या पावसामुळे अकोला शहरातील रतनलाल प्लॉट चौक, डाबकी रोड, आरोग्य नगर, हिंगणा रोड, सिंधी कॅम्प रस्त्यावर पावसाचे पाणी तुंबले होते. नाल्या भरल्याने हे पाणी रस्त्यावर साचले. नागरिकांना या रस्त्यावर साचलेल्या घाण पाण्यातून वाट शोधावी लागत असल्याचे चित्र होते.