लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: नगरसेवकांनी सुचविलेली कामे होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी महापालिकेच्या वतरुळात हालचाली सुरू झाल्या आहेत.सत्ताधारी पदाधिकार्यांचे मनपा आयुक्तांसोबत सूर जुळत नसल्याच्या चर्चेला बळ मिळत असून, सत्ताधार्यांसह विरोधी पक्षातील नगरसेवकही अविश्वास प्रस्तावासाठी सरसावल्याची माहिती आहे. आयुक्त अजय लहाने स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. मागील दोन वर्षांच्या कालावधीत सत्ताधारी व विरोधी पक्षातील अनेक नगरसेवकांसोबत त्यांचे खटके उडाले. सत्ताधारी भाजपातील गटबाजीचाही त्यांना सामना करावा लागला. विजय अग्रवाल यांनी महापौर पदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी व नंतरही काही दिवस अग्रवाल व आयुक्त लहाने यांचे फारसे पटत नव्हते. काही कालावधीनंतर मात्र सर्व काही सुरळीत झाल्यामुळे की काय, ‘अमृत’ योजनेंतर्गत ११0 कोटींची पाणी पुरवठा योजना, ७९ कोटींची भूमिगत गटार योजना निकाली काढण्यावर महापौर अग्रवाल आणि आयुक्त लहाने यांच्यात एकमत झाले. दोन्ही योजनांना मंजुरी देण्यास शासन सकारात्मक असल्याचे दिसताच पुन्हा एकदा आयुक्त अजय लहाने यांच्या विरोधातील राजकारण तापू लागले आहे. सत्ताधारी भाजपातील काही पदाधिकार्यांनी स्वपक्षीय नगरसेवकांसह विरोधी पक्षातील नगरसेवकांना एकत्र करीत आयुक्त लहाने यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती आहे. यासंदर्भात येत्या एक-दोन दिवसांत बैठक पार पडणार असून, त्यानंतर पुढील दिशा स्पष्ट केली जाणार असल्याची माहिती आहे.
मनपात संभ्रमाची स्थिती- मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करणार्या ‘स्थापत्य’ कन्सल्टन्सीचा विषय असो किंवा अमृत योजनेतील ११0 कोटींची पाणी पुरवठा योजना किंवा ७९ कोटींच्या भूमिगत गटार योजनेची मंजुरी व अंमलबजावणीच्या मुद्यावर खुद्द भाजपातच अंतर्गत कलह आहेत. - सत्ताधार्यांच्या चुकीवर बोट ठेवण्याची जबाबदारी असणार्यांविरोधी पक्षाच्या तंबूत कमालीची शांतता आहे. अशा स्थितीत सर्वच राजकीय पक्षातील नगरसेवक कोणाबद्दल काय बोलतील, अन् काय निर्णय घेतील,याविषयी अविश्वासाचे वातावरण आहे. त्यामुळे तूर्तास तरी महापालिकेत संभ्रमाची स्थिती आहे.