लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विदर्भ साहित्य संघाद्वारे अकोला येथे आयोजित पाचव्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन तथा बोधचिन्हाचे अनावरण प्रभात किड्स येथे मंगळवार, ३१ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. विदर्भ साहित्य संघाद्वारे अकोला येथे बालकुमार साहित्य संमेलन साने गुरुजी साहित्य नगरी, प्रभात किड्स येथे १ व २ डिसेंबर रोजी आयोजित केले आहे. या अभूतपूर्व संमेलनाची जय्यत तयारी करण्याच्या दृष्टीने प्रभात किड्स तोष्णीवाल ले-आउट येथे साहित्य संमेलनाचे कार्यालय उघडण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा ललित ट्युटोरिअल्सचे संचालक प्रा. ललित काळपांडे यांच्या हस्ते करण्यात आले, तर संमेलनाचे कौशल्यतेने क ॅलिग्राफीद्वारा सुप्रसिद्ध चित्रकार गजानन घोंगडे यांनी तयार केलेल्या बोधचिन्हाचे अनावरण महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस अँड. सुधाकर खुमकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोलाचे अध्यक्ष विजय कौसल, कार्याध्यक्ष सीमा रोठे शेटे, सचिव डॉ. गजानन नारे, प्रभात चॅरिटेबल सोसायटीचे सचिव नीरज आवंडेकर, संमेलनाचे सरचिटणीस प्रा.डॉ. सुहास उगले, चिटणीस डॉ. विनय दांदळे, सुरेश पाचकवडे, विजय देशमुख, प्रा. निशा बाहेकर, डॉ. साधना कुलकर्णी, प्रा. गजानन मालोकार, दिनेश ठोकळ व रवी धोंगळे प्रामुख्याने उपस्थित होते.
पाचव्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 2:01 AM
अकोला : विदर्भ साहित्य संघाद्वारे अकोला येथे आयोजित पाचव्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन तथा बोधचिन्हाचे अनावरण प्रभात किड्स येथे मंगळवार, ३१ ऑक्टोबर रोजी करण्यात आले.
ठळक मुद्देबोधचिन्हाचे अनावरण प्रभात किड्स येथे करण्यात आले