लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सार्वजनिक आरोग्य खात्यामधून सेवानवृत्त झालेल्या अकोल्यातील एका अधिसेविकेने ११ वर्षांच्या कालावधीत तब्बल पावनेतीन कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता बेकायदेशीररीत्या गोळा केल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी समोर आला. सार्वजनिक आरोग्य खात्यामध्ये वर्ग ३ कर्मचारी असलेली अधिसेविका मीना मनोहर माहुरे हिने तिच्या सेवाकाळातील १ जानेवारी २00२ ते ३0 जून २0१३ या ११ वर्षांच्या कालावधीत तब्बल २ कोटी ७0 ला ख 0५ हजार ७१८ रुपयांची अपसंपदा गोळा केली. ही अपसंपदा मिळकतीपेक्षा ४२0.७७ टक्के एवढी अधिक आहे. या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे झाल्यानंतर, लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे प्रमुख संजय गोर्ले यांनी सखोल चौकशी करून गीतानगर येथील रहिवासी सेवानवृत्त अधिसेविका मीना मनोहर माहुरे (वय ६१), तिचा पती व्यवसायाने शेती करीत असलेला मनोहर रामभाऊ माहुरे (वय ६५) व मुलगा स्वप्निल मनोहर माहुरे (वय २८) या तिघांविरुध्द बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी बुधवारी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुन्हा दा खल केला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे प्रमुख संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ईश्वर चव्हाण, सुधाकर गाडगे, पंचबुद्धे, काळे, उंबरकर, सुनील राऊत, ज्ञानेश्वर सैरीसे, दहीहांडे, गावंडे, खडसे व कश्यप यांनी केली.स्थावर मालमत्ता व सोन्याची माहितीमीना माहुरे, पती व मुलगा या तिघांच्या नावे असलेल्या स्थावर व जंगम मालमत्तेची अधिकाधिक माहिती घेण्यात येत आहे. यासोबतच त्यांच्याकडे असलेले सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व प्लॅटीनमसह अन्य दागिन्यांचा शोध घेण्यात येत आहे.नर्सिंग महाविद्यालयासह संस्थेची तपासणीमीना माहुरे हिच्या अकोला येथील घर व संस्थेच्या कार्यालयाची झडती घेण्यात येत आहे. तिने आकांक्षा सोशल वेलफेअर अँन्ड हयुमन डेव्हलपमेंट असोसिएशन नावाने संस्था उघडून त्याद्वारे सार्वजनिक विश्वस्त संस्थांचे नर्सिंग महाविद्यालय उघडले आहे. या संस्थेची ती २00३ ते २00८ मध्ये सदस्य होती. संस्थेमार्फत २ कोटी ७0 हजार ७१८ रु पयांची अपसंपदा गोळा केल्याचे एसीबीच्या त पासणीत समोर आले आहे.अकोट येथील प्लांटची तपासणीमीना माहुरे हिचा अकोट येथे वॉटर प्युरीफायर प्लांट असून, या प्लांटसह अन्य प्रतिष्ठानांची झाडाझडती घेण्यात येत आहे. एसीबीने चारही बाजूने जोरदार त पासणी सुरू केली असून, आणखी मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे.
पोलीस कारवाईअकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अधिसेविका मीना मनोहर माहुरे, तिचा पती मनोहर रामभाऊ माहुरे व मुलगा स्वप्निल या तिघांविरुद्ध अ पसंपदा प्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल केला.