अकोला : नगरविकास व गृहराज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी मंगळवारी सकाळी अकोल्यात मोटारसायकलवर फिरून विकासकामांची पाहणी केली. यावेळी कामांचा दर्जा, नियमांचे होत असलेले उल्लंघन व कामाची संथ गती यामुळे पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांसह ठेकेदारांचीही कानउघाडणी केली.अकोल्यात सध्या मोठया प्रमाणात विकास कामे सुरू असून या कामांचा दर्जा चांगला राहावा व सर्व कामे वेळेत पुर्ण व्हावीत म्हणून पालकमंत्र्यांनी यापूर्वीही अनेकदा निर्देश दिले आहेत. या निर्देशांची अमंजबाजवणी कशी सुरू आहे यासोबत काही कामांबाबत नागरीकांनी केलेल्या तक्रारीमधील वस्तुस्थिती जाणुन घेण्यासाठी पालकमंत्री तथा नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी सकाळी दहा वाजेपासुनच मोटारसायकलने पाहणी सुरू केली. शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणाºया १५ कोटीच्या सांस्कृतिक भवनाचे कामांवर कुठलाही फलक नसल्यामुळे कामाचा कालवधी, निधी, कधी पुर्ण होणार, ठेकदार कोण याबाबत सामान्य नागरीकांना माहिती कशी मिळणार, अशी विचारणा करून त्यांनी अधिकाºयांची कानउघाडणी केली. पुढील दोन महिन्यात हे भवन पुर्णत्वास येणे अपेक्षीत होते प्रत्यक्षात मात्र कामाची संथ गती पाहून पालकमंत्र्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करीत सर्व यंत्रणांना धारेवर धरले. असाच प्रकार अशोक वाटीका ते सरकारी बगीच्या कार्यालयाच्या पर्यंतच्या रस्त्याबाबत सुरू आहे. कामाच दर्जा व संथ गतीबद्दल पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना धारेवर धरले.
नगरविकास राज्यमंत्री मोटारसायकलवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 1:11 PM
नगरविकास व गृहराज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी मंगळवारी सकाळी अकोल्यात मोटारसायकलवर फिरून विकासकामांची पाहणी केली. यावेळी कामांचा दर्जा, नियमांचे होत असलेले उल्लंघन व कामाची संथ गती यामुळे पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांसह ठेकेदारांचीही कानउघाडणी केली.
ठळक मुद्दे अकोल्यातील विकासकामांची झाडाझडती